येवती गटातील पुरग्रस्तांना मदतीसाठी व गडग्याळवाडीच्या पाझर तलावाच्या           दुरुस्तीसाठी बोनलेवाड यांची पालकमंत्र्याकडे मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यातील जि.प. येवती अंतर्गंत गडग्याळवाडी येथील पाझर तलाव फुटण्याची शक्यता असुन नागरीकांच्या सुरक्षेच्या हिताने हा पाझर तलाव तात्काळ दुरुस्ती करावे व येवती गटातील पुरग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी येवती जि.प.गटाचे कॉग्रेसचे युवा नेते संतोष बोनलेवाड यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी केली आहे.तर  यावेळी  आमदार अमरनाथ राजूरकर उपस्थित होते.

मागील दोन ते तीन दिवसाखाली तालुक्यात पावसाने हाहाकार केला त्यात होनवडज येथील मातंग वस्तीतील नागरीकांचे मोठे नुकसान झाले तर गडग्याळवाडी गावातील पाझर तलाव पावसाच्या फुटण्याची शक्यता असुन पुरग्रस्तांना तात्काळ मदत दयावी व पाझर तलावाची दुरुस्ती करुन नागरीकांना न्याय दयावा अशी मागणी संतोष बोनलेवाड यांनी केली. यावेळी  डॉ  श्रावण रॅपणवाड यांची  प्रमुख उपस्थिती होती.

………

पुरग्रस्तांच्या घेतल्या भावना जाणून

होनवडज येथील मातंग वस्तीत पावसाचे पाणी शिरल्याने येथील नागरीकांना मोठा फटका बसला. ही घटना कळताच संतोष बोनलेवाड यांनी नागरीकांच्या भावाना जाणून घेतल्या तर गडग्याळवाडी येथील पाझर तलावाची पाहणीही केली.