अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रश्ननोतर संच पुरविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवेदन.

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र राजकारण

नांदेड:-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठाने आपआपल्या पद्धतीने तयारी केली आहे राज्य शासनाने देखील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून बहुपर्यायी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व ज्याला ऑनलाईन शक्य नाही त्यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला बऱ्याच विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दर्शवला तर काही विद्यार्थी संघटनांनी विरोध देखील केला.

बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेत असल्यामुळे त्यासाठी सखोल अभ्यास करणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे सर्व अभ्यासाचे साहित्य वसतिगृहात राहिल्यामुळे त्यांचा अभ्यास झालेला नसून आता जर त्यांना बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा द्यायची असेल तर खुप विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने देखील अन्य विद्यापीठाप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तर संच उपलब्ध करून घ्यावे अश्या सूचना विद्यापीठ प्रशासनास करावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी विद्यार्थी नेते तथा मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट (मास) या विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत साहेब यांना नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर,राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य तथा युवासेना राज्य विस्तारक प्रा.सूरज दामरे आदी मान्यवर उपस्थित होते.