उच्च शिक्षण मंत्री उदय सांमत यांची गाडी अडवण्याचा इशारा देणाऱ्या एसएफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड यांना अटक

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

मुखेड : पवन जगडमवर

उच्च शिक्षण मंत्री उदय सांमत हे दि १८ सप्टेंबर रोजी नांदेड दौय्रावर येणार असल्यामुळे त्यांची गाडी एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या वतिने अडवण्यात येईल असा इशारा एसएफआय चे राज्यअध्यक्ष काॅ बालाजी
कलेटवाड यांनी सोशल मिडीया द्वारे दिले होते.त्यामुळे बालाजी कलेटवाड यांना नांदेड पोलिसांनी रात्री दोन वाजता त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती.

बालाजी कलेटवाड यांना अटक झाली. हे समजताच नांदेड पोलिसांचा एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतिने सर्वत्र निषेध करत त्यांना त्वरित सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक मागण्यांसाठी एसएफआय सध्या आक्रमक झालेली आहे. शैक्षणिक मागण्यांना घेऊन आज राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा इशारा एसएफआयने दिला होता. याच पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी रात्री अचानक बालाजी कलेटवाड यांना अटक केली आहे. तसेच विद्यापीठातील अजून काही कार्यकर्त्यांना देखील अटक झाली आहे.

नांदेड पोलिसांच्या दादागिरी प्रवृत्तीचा एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी च्या वतिने निषेध करण्यात आले व बालाजी कलेटवाड यांना त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच विद्यापीठातील शैक्षणिक प्रश्नांचे निवेदन एसएफआयकडून प्रशासनाने स्वीकारून त्यावर लगेच कारवाई सुरू करावी, अशी मागणी एसएफआय च्या वतिने करण्यात येत आहे.


मंत्री उदय सांमत हे नांदेड च्या बाहेर गेल्यानंतर काॅम्रेड बालाजी कलेटवाड यांना नांदेड पोलीसांनी दुपारी 2 वाजता सोडून दिले असल्याची माहिती.बालाजी कलेटवाड यांनी लोकभारत न्युज चे प्रतिनिधी पवन जगडमवार यांना दिली.