मुखेड मोतीनाला पुराने नुकसान झालेल्या कुटूंबाना प्रतिमहिना दहा हजार रूपये ,मोफत राशन द्या – मा.क.प ची मागणी

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड

 

*अनेकवेळा मागणी करूनही संरक्षण भिंत बांधण्यास टाळाटाळ – जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी*

मुखेड / प्रतिनिधी – पवन जगडमवार

मुखेड शहरातील मोतीनालाच्या कडेवर गोरगरीब ,कष्टकरी,श्रमीक ,कामगाराने वसलेले महात्मा फुले नगर आणि वाल्मिक नगर येथे दि १६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आलेल्या पुराने घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.अनेकांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या घरातील जिवन आवश्यक वस्तु पुराने वाहून नेले त्यामुळे श्रमीक आत्ता जगवे कसा हा प्रश्न त्याच्या समोर पडला आहे.त्यामुळे या पूरग्रस्त कुटूंबाना ताबडतोब नुकसान भरपाई देऊन मानवी वस्तीच्या बाजूने संरक्षण भिंत बांधून देण्याची जुनी मागणी तात्काळ पूर्ण करा. अशी मागणी मार्क्सवादी कम्यनिष्ट पक्ष मुखेड च्या वतिने तहसिलदार काशिनाथ पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. अनेकवेळा मोतीनाला नदीच्या कडेने मानवी वस्तीच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.आंदोलन करण्यात आले तरी संरक्षण भिंत बांधण्यास संबधीत प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे आज या गोरगरीब लोकांनवर मरण्याची वेळी आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ संबधीत प्रशासनाच्या अधिकाय्रावर कारवाई करावी.

तीन दिवसांच्या सततच्या पावसाने मुखेड शहरातील मोतीनाला नदी पात्राला १६ सप्टेंबर च्या पहाटे साधारण २ ते ३ वाजता पुर आल्याने येथील वस्तीतील घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आणि घरातील संसारे उघड्यावर आली. घरातील सामान , धान्य , पैसे , कागदपत्रे भिजून पुराच्या पाण्यात वाहून गेली .एक वृद्ध महिला व लहान मुलगी वाहून जाताना स्थानिकांनी वाचवले.भंगार गोळा करणे , मासे धरणे , रोजंदरीचे काम करणे , हात गाडे चालवणे , भाजीपाला विकणे असे किरकोळ श्रम करून जगणाऱ्या श्रमिक जनतेच्या घरातील होते नव्हते सगळ पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने जगणे मुश्किल झाले.त्यामुळे तात्काळ या पूरग्रस्त परिस्थितीचे पंचनामे करून ताबडतोब पूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी.व स्वस्तधान्य दुकानातून मोफत रेशन पुरवावे , पुढील किमान सहा महिने प्रत्येक कुटुंबास दर महा किमान दहा हजार रूपयेची आर्थिक मदत करावी .व मोतीनाला नदीच्या कडेवर मानवी वस्तीच्या बाजूने संरक्षण भिंत बांधून संभाव्य मनुष्य हानी टाळावी अशी मागणी काॅम्रेड विनोंद गोविंदवार , काॅम्रेड अंकुश माचेवाड ,काॅम्रेड मंजूश्री कबाडे ,काॅम्रेड विजय लोहबंदे ,काॅम्रेड आनिल पांचाळ अदीचे निवेदनाद्वारे केले आहे.

……………..

उप विभागीय अधिकारी  मा. शक्ती कदम, मा तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी पूरग्रस्त भागामध्ये पाहाणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. सोबतच ज्या नागरिकांचे घरगुती सामानाचे व इतर नुकसान झाले अश्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्यासाठी शासकीय पातळीवर लवकर निर्णय घेण्यात येतील असे पाहाणी करता वेळेस सांगितले.