कलबुर्गी(गुलबर्गा) कर्नाटक विरशैव लिंगायत समाज बांधवांचे कलबुर्गी येथे आंदोलन

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

 

धानय्या स्वामी,अक्कलकोट

विरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आज कलबुर्गी येथे विविध मागण्यासाठी जनआंदोलन करण्यात आले.
जगद सर्कल पासुन या आंदोलनाला सुरवात करण्यात आली व कलेक्टर आॅफिस जवळ यांची सांगता कलबुर्गीचे कलेक्टर सौ व्ही व्ही ज्योत्स्ना यांना निवेदन देऊन करण्यात आले
१) यावेळी जंगम समाजाला बेडा, माला, बुडगा जंगम दाखले त्वरीत द्यावीत त्यात टाळाटाळ करु नये,
२)लिंगैक्य सिंध्दगंगा महास्वामीजी,व लिंगैक्य हानगल कुमारेश्वर महास्वामीजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा.
३)कलबुर्गी रेल्वे स्टेशनला कलबुर्गी शरणबसवेश्वर रेल्वे स्थानक म्हणुन नामांकित करावे.
४)या मागण्यासह विरशैव लिंगायत समाज बांधवांतील काही घटकांना आेबीसी प्रवर्गात मोडतात व त्यांना आेबीसी दाखले कर्नाटकात देण्यात येत असले तरी केंद्रात जनरल प्रवर्गाचे दाखले देतात तरी त्यांना केंद्रीय आेबीसी दाखले देण्यात यावी
५)तसेच शासनाकडून विरशैव लिंगायत समाजाच्या अभिवृद्धीसाठी विशेष विरशैव लिंगायत अभिवृद्धी निगम मंडळ स्थापना करावी
अश्या अनेक मागण्यासह जनआंदोलन करण्यात आले यावेळी कलबुर्गी जिल्ह्यातील कडगंची,आंदोला,पाळा,बबलाद,निलुर चिणमगेरी,कल्लबेन्नुर,महागाव,चंदनकेरा,माशााळ,सरडगी,दोणुर,काळगी गावच्या मठाचे महास्वामीजीसह अनेक शिवाच्यार्य,विरक्त मठांचे स्वामीजी,विरशैव लिंगायत अभिवृद्धी मंडळाचे राज्याध्यक्ष प्रशांत कल्लुर,दयानंद एम पाटील,सिध्देश्वर शास्त्री सुंटनुर,अनेक जंगम बांधव,विरशैव लिंगायत समाज बांधव सहभागी झाले होते.