बेरळी गावाला पुराचा फटका ; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान ; पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची सुरेश पाटील जुने यांची मागणी

नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : तालुक्यात मोतीनदी ला पूर येऊन बेरळी गावातील शेकडो हेक्टर पाण्याखाली गेली असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील कॉंग्रेस चे युवा कार्यकर्ते सुरेश पाटील जुने यांनी केली आहे.

बेरळी गाव हे मोती नदीच्या जवळच असून गावात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचा संपर्क तुटला असून बेरळी बु व बेरळी खु या दोन गावाचे पुरामुळे आपसातील दळणवळण तुटले आहे.

गावातील अनेक गुरे , ढोरे वाहून गेली असून अनेकांच्या दुचाकी सुद्धा या पुरात वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी सुरेश पाटील जुने यांनी केली आहे.