माकपा महासचिव कॉ.सीताराम येचूरी यांचे वरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत माकप चे निषेध आंदोलन

नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : पवन जगडमवार

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अ.भा.महासचिव कॉम्रेड सीताराम येचूरी यांच्यासह इतर निर्दोष नेत्यांवर दिल्ली दंग्याच्या निमित्ताने सीएए साठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोवण्याचे अत्यंत घृणास्पद कार्य केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिन असणाऱ्या दिल्ली पोलीसांनी चालविले आहे.यात नुकत्याच एका पुरवणी आरोप पत्रात दंगलीशी तिळमात्र संबंध नसनार्या माकपाचे महासचिव कॉ.सीताराम येचूरी यांचेसह योगेंद्र यादव,जयती घोष तसेच प्राध्यापक अपूर्वानंद यांना गोवण्याचे प्रयत्न होत आहेत. याचा तीव्र निषेध करीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नांदेड येथील कार्यालया समोर घोषणाबाजी करून अमित शहा व केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. माकपच्या वतीने आज जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली आहेत.केंद्रात भाजपाचे सरकार आल्या पासून शांततापूर्ण व लोकशाही पध्दतीने करण्यात येणाऱ्या आंदोलकावर त्यांचा संबंध नसलेल्या दुसऱ्या एखाद्या केस मध्ये आंदोलकांना जाणीवपूर्वक अडकवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.भिमा कोरेगांवचे प्रकरण हे त्याचेच ढळढळीत उदाहरण आहे.हा भारतीय संविधानाचा,संवैधानिक अधिकाराचा अपमान असून केंद्र सरकारने असे घृणास्पद प्रकार न करता भारतातील लोकशाही आणि जनतेचे संवैधानिक रक्षण करत असताना आंदोलनकर्त्यांनाही लोकशाही आंदोलनाचे हक्क प्रदान करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.या निषेध आंदोलनाचे नेतृत्व कॉ.बालाजी कलेटवाड,कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.डॉ.सचिन खडके,कॉ.सं.ना.राठोड,कॉ.जयराज गायकवाड,कॉ.कपील गायकवाड आदींनी केले.