*मुखेड तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार ; मोतीनाला नदीला पुर आल्याने शहरातील अनेक घरात पाणी शिरले ; पिकांचे मोठे नुकसान तर जनावरेही मृत्यु पावली

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

*चांडोळा, बेनाळ ,इटग्याळ ,हसनाळ ,आंबुलगा , होनवडज येथे ही नुकसान*

मुखेड / प्रतिनिधी -पवन जगडमवार :

मुखेड तालुक्यात सोमवारी रात्री पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजवले तर दि १५ रोजी मंगळवार च्या मध्य रात्री बुधवार च्या पहाटे झालेल्या अती मुसळधार पावसामुळे मुखेड शहरातील मोतीनाला नदीला पुर आल्याने पहाटेच्या सुमारास अनेक घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू खराब झालेत.तर अनेकांचे शेळ्या मेंड्या पाण्यात बुडून मृत्यु पावले आहेत.तर अनेक घरातील जिवनअवाश्याक वस्तु ही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे अनेक कुटूंबावर आत्ता उपास मारीची वेळ आली आहे.

मुखेड तालुक्यातील
चांडोळा, जाहूर, बेनाळ ,हसनाळ ,आंबुलगा बु) ,वसुर,होनवडज, राजूरा , गोजेगाव ,कबनुर , बिल्लाळी , उद्री ,चोंडी, औराळ , कंलबर ,इटग्याळ,मुक्रामाबाद ,बाह्राळी अदी गावातील शेतकय्रांचे मोठे हाल झाले अगोदर मुग अतिवृष्टी मुळे गेले तर आत्ता शेतातील उडिद, कापूस , सोयाबिण , तूर ज्वारी या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांच्या शेतात पाणी शिरून पिके वाहून गेली. तर काही जणाच्या शेतात पाणी साचले आहे . तर आंबुलगा येथिल शेतकय्राचे सोयाबिन ,तुर व कापसाचे पिके अडवे पडले आहे.

हवामान खात्याने पुर्वसुचना दिल्याप्रमाणे तालुक्यात सोमवारी दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री पांसुन सुरू झालेला मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पावसाने चांगलेच झोडपले, नदी काठावरील शेताची जमीन खचली आहे. तालुक्यातील जामखेड तलाव प्रकल्पाच्या कालव्यामुळे हसनाळ प.दे.येथील अनेक घरात पाणी शिरले, तसेच होनवडज येथील मातंग वाड्यात गुडघ्याऐवढे पाणी जमा झाल्याने घरातील धान्य, कपडे, वस्तू आदींचे नुकसान झाले. शहरातील व तालुक्यातील अनेक जुने घरांच्या भिंती पावसाने पडल्याने नुकसान झाले. शहरातील मोतीनाला, मोहनावती नदीला पुर आल्याने काही काळ वाहतुक ठप्प होती, राज्य महामार्गावरील मोहनावती धाब्याजवळील पुलावरुन पाणी वाहत असल्याने दोन्ही कडील वाहतुक काही काळ ठप्प होती. तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी धामणगाव, बेटमोगरा, उच्चा, खतगाव आदी गावांची पुरपरिस्थितीची पाहणी करुन आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी आदींना आदेशित करणार असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली. हाताशी आलेले मुग, उडीद नंतर सोयाबीन ,कापूस ,तूर ज्वारी पिके ही पावसामुळे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन शासनाने तात्काळ पंचनामे करुन नुकसना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मुखेड शहरातील मोतीनाला परिसरातील नागरिकांच्या मदतीला अनेक शेतकरी पुत्र धावले आहेत .तालुक्यातील शेतकरी पुत्र खवळेले आहेत.तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ शेतकय्रांना व ज्याचे घरे कालच्या पाण्याने पडले व गोरे डोरे मृत्यु पावले अशांना तात्काळ मदत द्या .यंदाचा पिक विमा ही मंजूर करा.नुकसान ग्रस्तांना तातडीने मदत द्या अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचे शेतकरी नेते शिवशंकर पाटील कंलबरकर , काॅम्रेड विनोंद गोविंदवार , बालाजी पाटील ढोसणे,बालाजी पाटील सांगवीकर , रमाकांत पाटील जाहूरकर , वैभव पाटील राजूरकर , काॅम्रेड अंकुश माचेवाड ,अदीने सांगितले.