अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे एक गांव एक पंचनामा करुन शासन निर्णयानुसार अतिवृटी व ढगफुटी भागात पिक विमा मंजुर करा… बालाजी पाटील ढोसणे यांची तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड :  पवन कँदरकुंठे

गेल्या दोन दिवसापासुन मुखेड तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असुन अगोदरच्या अतिवृष्टीमुळे बहरात आलेले मुग,ऊडीद पुर्णता गेले व आता हाताशी आलेले सोयाबीन बहरात असलेली कापुस, तुर, ज्वारी, आदी पिके झालेल्या ढगफुटीमुळे,नदीच्या पुरांमुळे वाहुन गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सरसकट एक गांव एक पंचनामा करावे हि मागणी आज मुखेड तहसिलदार काशीनाथजी पाटील यांची भेट घेवुन शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे व रमाकांत पाटील जाहुरकर यांनी केली.

शासन नियमानुसार संकटात सापडलेल्या अतिवृष्टी, ढगपुटी, पुराने व जमीनीचे भुस्खलन झालेल्या पिकांचे नुकसान झालेल्या व पिकविमा भरलेल्या शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार 48 तासात विमा कवच देण्याचीही मागणी आज लावुन धरली व पिक विमा कंपनीचे Crop Insurance ह्या अँप वर तक्रार करताना शेतकर्‍यांना ओटीपी येत नसल्याने तात्काळ ते प्राब्लेम दुर करावा अशी मागणी ढोसणे यांनी तहसिलदाराकडे केली.

तहसिलदार काशीनाथ पाटील यांनी नदीकाठच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असुन ऊर्वरीत आदेशही लवकरच काढण्यात येणार असल्याचे ढोसणे यांना सांगीतले यावेळी रमाकांत पाटील जाहुरकर ऊपस्थित होते.