सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी 30 सप्टेंबरपुर्वी महास्वयंम पोर्टलवर माहिती अद्ययावत करावी – सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची नोंदणी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने http://www.rojgar.mahaswaya.gov.in हे वेबपोर्टल व गुगल प्लेस्टोअरमध्ये Mahaswaya हे Application विकसित केले आहे. या वेबपोर्टलवर सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त‍ रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

यापूर्वी ज्या उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. मात्र आधारक्रमांक नोंदणी क्रमांकाशी संलग्न केलेला नाही. तसेच ई-मेल, मोबाईल क्रमांक व पत्ता अद्ययावत केलेला नाही. अशा उमेदवारांनी संबंधित वेब पोर्टलवर अथवा गुगल प्लेस्टोअरमधुन Mahaswaya हे Application ॲन्ड्रॉइड मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन नोंदणी करुन सर्व माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार 30 सप्टेंबरपुर्वी आपली माहिती अद्ययावत करावी अन्यथा महास्वयंम वेब पोर्टलवरील नोंदणी रद्द होईल असेही पत्रकाद्वारे कळविले आहे.

नोंदणी अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना काही अडचण आल्यास nandedrojgar@gmail.com या ई-मेलवर अथवा दुरध्वनीवरुन (02462-251674) संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
[11:12, 9/15/2020] Vaijnath SWami Nanded: सुट्टीच्या दिवशी शिकाऊ, पक्की अनुज्ञप्ती चाचणी सुरु

–         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

नांदेड (जिमाका), दि. 14 :- शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी उशीराने अपॉईंटमेंट मिळत असल्याने प्रतिक्षा कालावधी वाढला आहे. हा कालावधी कमी करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने आता प्रत्येक शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी अपॉईंटमेंट उपलब्ध करण्यात आली आहे. अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंटमेंट घेवून त्यादिवशी चाचणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित रहावे. परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीचा कोटा वाढविण्यात आलेला आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.