मुदखेड तालुक्यातील माैजे ईजळी (वरची) येथे वीज पडून एक म्हैस जागीच मुत्युमुखी…!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुदखेड

नांदेड : विशेष प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील ईजळी (वरची) येथे वीज पडून एक म्हैस जागीच मुत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
दि.१५ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी १० दरम्यान विजेच्या कडकडाट सह पाऊस सुरू झाला व गावच्या शेजारच्या दत्तमंदिर परिसरातील शिवारात देवराव कामाजी जाधव यांची म्हैस बांधलेली असताना अचानक मोठा आवाज करीत विज म्हैसीवर येऊन पडली यात म्हैस जागीच मुत्युमुखी पडली.

सदर घटना घडताच गावातील नागरिक शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला घटनेची माहिती दिली.यानंतर तलाठी संदिप केंद्रे, पशुवैद्यकीय अधिकारी बी.बी. बुचलवार यांनी पंचनामा करुन मुदखेड पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत म्हशीचे शवविच्छेदन करण्यात आले.

यावेळी घटनास्थळी भुजंग मारुती मुंगल, परीक्षित दत्तरम मुंगल,भिमराव श्रावन हाटकर सरपंच, अशोक दत्‍तराम मुंगल, वामन लक्ष्मण मुंगल, मुरलीधर देवुबुवा ढगे,चांदु देवराव जाधव व्‍यंकटी देवराव जाधव आदिसह गावातील लोकप्रतिनिधी,नागरिकांची उपस्थिती होती