आंबुलगा येथील दोन बँन्ड वादक तरूणाची अनोखी कहाणी* *जगण्यासाठी करावी लागणारी धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड – पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु) येथिल बँन्ड वादक माधव एकनाथराव सोनकांबळे व बालाजी हाणमंतराव कांबळे या मागास्वर्गीय तरूणाची हि कहाणी आहे.अतिशय हलाकीची परिस्थिती हातावरचे पोट ,काम केले तरच पोट भरेल, अन्यथा उपासमारीने मरावे लागेल, अशी यांची परिस्थिती आहे. हे दोन तरूण हैदराबाद मध्ये सहा महिने कलरींग चे काम करायचे. आणि रात्रीला कंटीग सलून मध्ये जाऊन कंटीग शिकण्याचे काम करायचे. आणि परत ऊन्हाळ्यात लग्नसराईत गावाकडे येऊन बँन्ड वाजवण्याचे काम करायचे. आणि कसेबसे करून कुटूंबाचे पोट भरवायचे त्यांना बँन्ड वाजण्या बरोबर कलरींग सह – कंटीग करण्याची कला ही अवगत होती.

मात्र कंटीग करणे हा व्यवसाय आपल्या समाजात नाही.ग्रामीण भागात जर असा व्यवसाय कोणी करत असेल.तर लोक त्यांना हसतात त्यामुळे या तरूणाना कटींग करण्याची कला हस्तगत असुनही ते करत नव्हते.

दरवर्षी लग्नसराईत गावाकडे यायचे चार महिने बँन्ड वाजवण्याचे काम करायचे आणि या तीन ते चार महिण्यात ३० ते ४० हजार रूपये हे तरूण बँन्ड वर कमवायचे. लग्नसराई संपली की परत कलरींगच्या कामाला हैदराबाद ला जायचे.मात्र
ऐन लग्न सराईतच यंदा देश लाॅकडाऊन करण्यात आले .त्यामुळे सार्वजिनक ठिकाणी एकत्र जमने, सण ,उत्सव ,विवाह सोहळा साजरी करणे यावर बंदी घालण्यात आली होती.

दरवर्षी ऊन्हाळ्यातील मार्च ,एप्रिल ,मे ,जुन , या चार महिण्यात मोठ्या प्रमाणात विवाह होतात. मात्र यंदा कोरोना कोव्हीड १९ मुळे मार्च महिण्या मध्येच लाॅकडाऊन घोषीत कल्यामुळे.विवाह सोहळा धुमधडाक्यात ढोल ,ताशा वाजवत मनासारखे करता आले नाही.त्यामुळे अनेकांनी घरातल्या घरातच मोजके चार व्यक्ती घेऊन विवाह केले. आणि विवाह सोहळ्यात या वर्षी बँन्ड लावले नसल्यामुळे यंदा या तरूणाचे मोठे नुकसान झाले. बँन्ड वाजवण्याचा मुख्य व्यवसायच असल्यामुळे यंदा ते कोरोनामुळे बंद पडला.आणि त्याची आर्थिक घडी ढासाळली आणि उत्पादनाचे साधनच बंद पडले.आणि परत हैदाराबादला जाऊन काम करावे. तर कोरोना मुळे काम मिळत नाही.आणि यंदा बँन्ड ही बंद . हाताला काम नको. लाॅकडाऊन मुळे हतबल झाले , उपसारमारीची वेळ आली होती.जगावे कसे हा प्रश्न त्यांच्या समोर पडला. तेव्हा या तरूणानी व्याजाने पैसे काढून आंबुलगा सारख्या ग्रामीण भागात रविराज हेअर सलून या नावाने सलून दुकानांची सुरूवात केले.आणि एक महिण्यातच हे दुकान त्यांना अवगत असलेल्या वेगवेगळ्या हेअर स्टाईलमुळे इतके प्रसिध्द झाले की आजुबाच्या खेड्यातील सर्वच लोक दाडी ,कंटीग ,मसाज ,चेहरा फ्रेशिंग करण्यासाठी आंबुलगा येथिल रविराज हेअर सलूनला येऊ लागले .या हेअर सलून मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दाडी,कटींग, आणि चेहरा फ्रेश करण्याचे पाच ते सहा प्रकारचे मशिन आहेत.वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे चेहरा फ्रिशिंग चे क्रिम ,केस कलरींग अशा सर्व सुविधा आणि अत्यअल्पदरात ग्रामीण भागात पहिल्यांदाच उपलब्ध झाल्यामुळे हे दुकान लवकरच प्रसिध्द झाले. आज या दुकानात जाहूर ,राजूरा,भाटापूर ,सांगवी ,इटग्याळ ,वसुर , माकणी , कोरनुळ ,हसनाळ सह आजूबाजूच्या खेड्यातील तरूण या ठिकाणी कटींग साठी मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत.तर दर रोज दोन ते अडीच हजार रूपये चे काम करत असल्याचे हेअर सलूनचे मालक बालाजी कांबळे यांनी सांगितले.