वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना भारतरत्न द्या –  आमदार डॉ तुषार राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
      वसुंधरारत्न ,राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे .
आमदार डॉ तुषार राठोड 
       डॉ शिवलिंग शिवाचार्य यांचे सांस्कृतिक कार्यामध्ये मोलाचे योगदान असून वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळूनही महाराजांना धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले विद्वत्ता आणि अमोध वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले त्यांनी धर्म आणि राष्ट्रअभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले धर्मप्रसार बरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम केले महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह इतर समाजासाठी मार्गदर्शन असून अध्यात्मपनप्रसार, वृक्ष  जोपासना व राष्ट्रधर्म या त्रिसूत्रीवर त्यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे तसेच लिंगायत स्वतंत्रधर्म आंदोलनात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.
    आयुष्यभर समाजसेवेचा विडा उचलून सर्वसामान्य जनतेला अध्यात्मिक धडे देणाऱ्या राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कार्याचा शैक्षणिक पाठ्यपुस्तकात समावेश करून भारत मातेच्या पुत्रास भारतरत्न प्रदान करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे.