नांदेड जिल्हाभर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणार – खा.प्रतापराव पा.चिखलीकर

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : भारतीय जनता पार्टी.नांदेड नेहमीच सामाजिक.शैक्षणिक.धार्मिक कार्यक्रम राबवत आसते.यावर्षी कोरोना महामारी मुळे मोठ्या प्रमाणात गुणवंताचा सत्कार कार्यक्रम घेऊन पुरस्कार वाटप न करता गुणंवत विद्यार्थ्यांना घरपोच सत्कार करणार आहोत .कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ देण्यासाठी आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनावे म्हणून नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे गुणंवत विद्यार्थ्यांचा घरपोच सत्कार करणार आसल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी सागितले आहे.

नांदेड जिल्हा शैक्षणिक क्षेत्रांत आतिशय चागली प्रगती करत आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी आय.ए.एस.आय.पी.एस मध्ये देशात झळकले आहेत.म्हणून शिक्षणाचे महत्त्व आज दिसत आहे. इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घरपोच करण्याचा माणस आहे. दहावी व बारावी नंतर काय या बाबत विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरवण्याची जबाबदारी संस्था, विद्यार्थी,पालक या तिघांचीही आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुढील प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या. प्रत्येक क्षेत्रात संधी आहे ती शोधाता आली पाहिजे. त्यातून योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे. वडिलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. मोबाईल मधील इंटरनेटचा वापर शैक्षणिक प्रगती साठी करा. आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून कष्ट करा. योग्य ती संधी आपल्याकडे चालत येईल,

जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या SSC वा HSC शिक्षणात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. नांदेड जिल्हयातील कोणताही विद्यार्थी देशातील कुठल्याही स्पर्धाच्या बाबतीत कमी नाही. येथील विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची शर्थ करु आनेक क्षेत्रात. साधला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणातही येथील विद्यार्थ्यांनी यशाचा कळस गाठला आहे. कष्टाची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर आपले विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करू शकतात, आसे मत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी व्यक्त केले.

दहावी व बारावी बोर्डा मध्ये 80% गुण प्राप्त आहेत आश्या विद्यार्थ्यांनी साई-सुभाष वंसतनगर नांदेड येथे संपर्क कार्यालयात नांव नोदनी करावी फक्त मोबाईल वरुन वाँटसअप वर मार्कमेमो.पत्ता/आधार कार्ड व मोबाईल नंबर द्यावा.सुनिल रामदासी.यांच्या कडे. 9423136441 या नंबर वर पाठवून द्यावे आसे संपर्क कार्यालयातुन कळविण्यात आले आहे.