जातीयवादाचे उडालेले शिंतोडे पुसण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे ओबीसीला तालुकाध्यक्ष पदाची संधी देणार ?

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

नांदेड : मुदखेड पंचायत समितीचे सभापती बालाजी सूर्यतळे निवघेकर यांनी काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर जातीयवादाचे शिंतोडे उडवत वंचित आघाडीत प्रवेश केल्यामुळे तालुका कांग्रेस कमिटीमध्ये एकच खळबळ उडाली.या घडामोडीमुळे मुदखेड तालुका कांग्रेस कमिटीमध्ये मोठे फेरबदल होणार असे संकेत शिवाजीनगरहून मिळाले असून जातीयवादाचे उडालेले शिंतोडे पुसण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी ओबीसी प्रवर्गाला देणार ? अशी चर्चा सुरु आहे.

मुदखेड तालुक्यात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडत असून तेवढयात जोमात राजकीय कुरघोडीही वाढल्याची चर्चा आहे.राजकारणात कोणी कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो,असे मराठीत जुनी म्हण आहे.यामुळे अनेकदा चित्र,विचित्र अनुभव ऐकावयास मिळतात.काही दिवसापूर्वी सभापती बालाजी सुर्यतळे यांनी काही स्थानिक पदाधिकारी हे जातीय द्वेशाने पक्षाच्या काही स्थानिक जबाबदार पदाधिकाऱ्यांकडूनअनेक कार्यक्रमात डावलण्यात येत असल्यामुळे आपण वंचित आघाडीमध्ये प्रवेश करत असल्याचे टीव्ही चॅनल,प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्टीकरण दिले. हीच बाब पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना चांगलीच बोचल्याची चर्चा आहे.कारण दिल्लीतील पक्ष नेतृत्व (हायकमांड) हे नेहमी इतर नेत्यांना,पदाधिकाऱ्यांना धर्मनिरपेक्ष पद्धतीने वाटचाल करावी तसेच प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहण्याचा संदेश देत असते,असे असताना मुदखेड तालुक्यातील काही स्थानिक पदाधिकारी हे पक्षाच्या विरोधात जाऊन जातीला खतपाणी घालत कार्यरत असल्यामुळे तालुक्यातील पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी असलेल्या तालुकाध्यक्ष पदावर फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरु आहे.यामुळे पालकमंत्री चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील अोबिसी प्रवर्गातील लोकांच्या भावना लक्षात घेत तसेच जातीयवादाचे उडालेले शिंतोडे पुसून टाकण्यासाठी आता पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे मुदखेड तालुकाध्यक्षपदावर अोबिसी प्रर्वगातील व्यक्तीला संधी देणार ? अशी चर्चा सूरू आहे.

राज्याचे सा.बां.मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी खंबीरपणे पार पाडण्यासाठी तालुक्यातील माळकाैठा,पांढरवाडी,चिलप्रिपरी,वाडी,डोणगाव,चिकाळा,पिंपकाैठा,बारड,वैजापूर,मेंडका, वासरी,डोंगरगाव,शेंबोली आदि गावातून अनेक जण इच्छूक आहेत.पालकमंत्री चव्हाण यांच्यासाठी ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते जीव ओतून कार्य करण्यास पक्ष विस्तार करण्यास इच्छुक आहेत.परंतु पक्ष वाढीच्या कार्यात विद्यमान तालुकाध्यक्ष हेच सकारात्मक भूमिकेत नसतात. यामुळे पालकमंत्री चव्हाण यांनी नेतृत्व लायक कार्यकर्ता अोळखून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्याची वेळ आली आहे,तरच पक्षाचा विस्तार मोठ्या जोमाने होऊ शकतो असे अनेक गावच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले.