तालुकाध्यक्ष पदावरून निवघेकरांना हटवा अन बारडकरांना बसवा;अशी मागणी झाल्याची जोरदार चर्चा! पंचायत समिती सभापतींच्या पक्षातंरावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांची झाडाझडती ?

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र राजकारण

नांदेड: तालुक्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा संघटनेचे तालुकाध्यक्ष पद हे एक महत्त्वाचे व मानाचे स्थान मानले जाते.यामुळे संघटनात्मक पद सांभाळणाऱ्या व्यक्तिमत्त्वाकडे दूरदृष्टी,संयम,अंगी संघटन काैशल्य,अष्टपैलू गुण,मनमिळाऊ स्वभाव असे विविध गुण असावे लागतात.परंतु देणारा देतोय; आपल्याला तर फक्त राखण करायचे अशाप्रकारे कोणतेही पद सांभाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेण्यागत प्रकार होय….असो..सध्या या काळात तालुकाध्यक्ष पद सांभाळणारे एका निवघेकरांनी आपल्याच गावाचे भुमिपत्र पंचायत समितीचे सभापती बालाजी सुर्यतळे यांच्या विरोधात भूमिका घेवून पक्षाच्या कार्यक्रमात डावळल्यामुळे सुर्यतळेनी वंचित आघाडीत प्रवेश केला.या घडामोडींने कांग्रेसच्या स्थानिकच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना चांगलीच चपराक मानली जात असून खुद सा.बां.मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनाही मोठा धक्का मानला जातोय कारण भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली.

पं.स.सभापती बालाजी सुर्यतळे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची त्यांच्या विरुद्ध दंड थोपटून पक्षातंर केल्याची बाब लक्षात आल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घ्यायला सुरूवात केल्याची चर्चा सूरु असून यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून असे प्रकार खपवून घेणार नाही.काम करायचे असेल तर नीट करा अन्यथा चालते व्हा,मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अनेक बाबी माझ्यापर्यत येत असतात.मला काहीच माहिती होत नाही असे अजिबात समजू नका,स्थानिकची कुठलीही घटना -घडामोडी राज्यभरात गाजत असेल तर मला त्यांची उत्तरे द्यावी लागत असतात याचे भान पदाधिकाऱ्यांनी ठेवावे.
यामुळे मी नाहक त्रास का सहन करू असे खडे बोल सुनावत स्थानिकच्या त्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिल्याचीही चर्चा आहे.

या राजकीय घडामोडीमुळे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी निवघेकरांकडून तालुकाध्यक्षपद काढून ते बाजारपेठेचे मोठे गाव असल्यामुळे बारड गावात तालुकाध्यक्ष पद द्यावे अशी मागणी एका गटाने पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे केल्याची चर्चा आहे.
बारड गाव तालुक्याचे सत्ता केंद्र म्हणून वेगळी अोळख आहे.तिथे भाजपाचे भोकर विधानसभा संयोजक पद,राष्ट्रवादी कांग्रेस तालुकाध्यक्ष पद,मा.शिवसेना तालुकाप्रमुख पद असे विविध राजकीय पक्षाने पदे दिली गेलेली आहेत.यामुळे कांग्रेस तालुका कमिटी अध्यक्षपदाची माळ बारडकरांच्या गळ्यात लवकरच पडणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.