मुखेड – कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना मिळतो मोफत ऑननलाईन सेवेचा लाभ….रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराचा उपक्रम

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : पवन जगडमवार – कोरोना महामारिमुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन अनेकांचे व्यवसाय बंद झाल्यामुळे पोटाचा प्रश्न समोर आला आहे.अनेकांना उपासमारिची वेळ आली.हाताला काम नाही.ना खिशात पैसा नाही या मुळे सामान्य माणसे,शेकरी,मजूर, भुमिहीन यांचे बेहाल झाले.

या मुळे मुखेड – कंधार मतदार संघातील शेतकरी व लाभधारकांना रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या उपक्रमातून
मोफत आॅनलाईन सेवा उपलब्ध करुन दिल्यामुळे शेकडो शेतकरी या सेवेचा लाभ घेत आहेत.

 

त्यामुळे मुखेड – कंधार मतदार संघात रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराने मदतीचा हात देण्याचे काम तालुक्यात करत असल्यामुळे, तालुक्यातील मुखेड,मुक्रमाबाद, बाह्राळी या तीन ठिकाणी मोफत आॅनलाईन केंद्र उभारून शेतकय्रांना मोफत सेवा पुरवली जात असल्यामुळे.या सेवे मार्फत तालुक्यातील तब्बल १ हजार ६८० शेतकऱ्यांचा मोफत पिकविमा भरून देण्यात आला. तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थी असलेल्या ५०० हून अधिक शेतकय्रांचे मोफत आधार प्रामाणीकरण करण्यात आले आहे.असे एकुण २१८० शेतकय्रांनी याचा लाभ घेतला तर ३५ रुपयात किसान क्रेडिट कार्ड
योजनेचा १०० शेतकय्रांनी लाभ घेतले, तर ११० रुपयात ५० लाभधारकांनी नविन पॅनकार्ड काढून घेतले.तर १५ रुपयात किसान सन्मान योजनाचे २० जनांची नोंदणी करण्यात आली. यामुळे अनेक शेतकय्रांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसे बचत झाले. त्यामुळे रामदास पाटिल मिञपरिवाराच्या वतिने शेतकय्रांसाठी उपलब्ध केलेल्या मोफत आॅनलाईन सेवा मुळे मुखेड – कंधार मतदार संघातील असंख्य शेतकय्रांना याचा चांगलाच लाभ होत अाहे.