वळंकी येथील ग्रामपंचायतीने केली विविध प्रजातींच्या 800 वृक्षांची लागवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

बाराहाळी: पवन कँदरकुंठे

मुखेड तालुक्यातील वळंकी येथील ग्रामपंचायतीने विविध प्रजातींच्या फळे फुलांच्या 1000 झाडांची लागवड व वेगवेगळ्या विविध झाडाची मियावाकी आनंद घनवन योजणेच्या पद्धतीने ही लागवड करण्यात आली.

कोरोणाच्या नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक कामे करून गावातील नागरिकांना शुद्ध हवा मिळण्याच्या हेतूने तसेच झाडाच्या सावलीत पक्षी प्राणी बसावे, पक्षांना घर व फळ तर कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावात नागरीकांना शुद्ध आँक्सीजन मिळावे या हेतूने गावातील विविध आजुबाजुंच्या रिकाम्या जागेत सिताफळ,करंजा,आवळा,चिंच,शेवगा अशा विविध 800 ते 1000 रोपट्यांची लागवड करण्यात आली.

सदर व्रक्ष लागवडीसाठी, सरपंच, लक्ष्मीबाई भुमणवाड, ग्रामसेवक, प्रमेश्वर मुंडे, सेवक राजीव भुषणवाड, व तसेच गावातील नागरीक ईत्यादींनी व्रक्षलागवडीसाठी परिश्रम घेतले.


वळंकी येथील ग्रामपंचायतीला साधारणत: विविध प्रजातीच्या एक हजार अशी रोपटे देण्यात आली होती त्यात आम्ही 800 रोपट्याची लागवड ही आम्ही केलेली आहे. व ऊर्वरीत रोपटे ही गावातील काही नागरीकांनी ज्यांच्या त्यांच्या शेतामध्ये व्रक्षलागवड करण्यासाठी घेवुन गेली.

प्रमेश्वर मुंडे ग्रामसेवक
ग्रामपंचायत काय्रालय
वळंकी.ता.मुखेड*