कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबाबत पोलीस निरिक्षक नरसिंग आकुसकर यांचा सन्मान

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :पवन जगडमवार

९ ऑगस्ट क्रांतीदिनी मुखेड येथील हुतात्मा चौकात मुखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक नरसिंग आकुसकर यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरी बद्दल गणाचार्य मठातील गणपती अध्यक्ष गणेशराव बाळाजी पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . सध्याच्या परिस्थितीत मुखेडचे तहसीलदार , नगरपालिकेचे अधिकारी कोरोना ग्रस्त झाल्याने कोरोना नियंत्रणावर त्याचा प्रभाव पडेल असे वाटत असतांना मुखेड पोलीस स्टेश्नचे पोलीस निरिक्षक नरसिंग आकुसकर यांनी सर्व भार सांभाळत कर्मचाय्रांना सोबत घेऊन अथक परिश्रम घेत मुखेड तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी घेतलेली भरपूर मेहनत हि कौतुकास्पद होती .त्याच्या या कामगिरीबद्दल त्यांना कोरोना यौध्दा म्हणून सन्मान करण्यात आले होते.

शिवकुमार पुंडलिकराव बंडे यांनी ज्येष्ठ मान्यवरांना सोबत घेवून पोलीस निरिक्षक नरसिंग आकुसकर यांचा सन्मान करण्याचे नियोजन केले आणि हा सत्कार सोहळा संपन्न झाला . यावेळी विलास चव्हाण , बसवराज फुलवळकर , माधवराव तुंगनवार , गोविंदराव रेणगुंटवार , गोविंद डोंगरे , शिवसांब बंडे , बाबूराव पाटील , गंगाधर बंडे , नागनाथ बंडे , दिपक वाकडे , सुरेश बंडे , पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बंडे , सहसचिव नामेदव श्रीमंगले , छायाचित्रकार चरणसिंह चौहाण , सोमनाथ बंडे , गुरूनाथ बंडे या सर्वांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला .