बँकाचा कारभार कासवगतीने शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी करावी लागते कसरत…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
बाराहाळी: पवन कँदरकुंठे
शेतकऱ्यांच्या नशीबी कधी आसमानी तर कधी सुलताणी संकट ठरलेलेच त्यात या वर्षी कोरोणा महामारीचे महासंकट शेतकऱ्यांच्याच नशीबी, शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळविण्यासाठी मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. जिल्हाधिकार्यांने शेतकरी कर्ज देण्यासाठी बँकांनी तत्परता दाखवावी असा आदेश काढुन देखील अद्यापही बँकेच्या प्रशासनाकडून या आदेशास म्हणावे तसे अवलंबविले जात नाही. बर्याच बँका या आदेशाला केराची टोपली दाखवीत असल्याचेही शेतकऱ्यांच्या आक्रोषावरून पहावयास मिळते.
मुखेड तालुक्यातील अनेक बँकांमध्ये खरीप हंगामातील पिककर्जासाठी शेतकरी खेटे मारत असुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करीत कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना तालुक्यांना अनेक खेटे मारावे लागत आहे. कागदपत्रे जुळवण्यात नाकी-नऊ येत असुन नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा इत्यादी बँकात संबंधित शेतकरी खरीप हंगामातील पिककर्ज मिळवण्यासाठी जात आहेत. बँकांनी कमीत कमी कागदपत्रे घेऊन पिक कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवुन आवश्यक कागदपत्रांसह टोच नकाशा, फेरफार नक्कल अशा गरज नसलेल्या कागदपत्रांची सक्तीने मागणी करण्याचे काम बँका करत आहेत.
ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना नाईलाजाने कोरोणा संसर्ग होण्याची भिती बाजुला सारुन तालुक्यात अनेक खेटे मारत विविध कार्यालयातुन कागदपत्रे जुळवावे लागत आहेत. कर्ज मिळविण्यासाठी सकाळपासूनच लांबलचक रांगेत दिवसभर अभे रहावे लागत आहे.
माझ्या तालुक्यातील जनता सुखी राहीली पाहिजे असे वावडी लावणारे पुढारी मात्र मुग गिळुन गप्प आहेत. प्रशासनाने योग्य वेळी लक्ष घातल्यास शेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्न सुटेल.

अनेक बँकांमध्ये कर्जासाठी लावावा लागतो वाशीला…
ग्रामीण भागात राष्ट्रीयक्रत बँका अस्तित्वात आल्या असून अनेक बँकाचे विलगीकरण झाले असल्याने या बँकांमध्ये शेतकरी कर्ज उचलण्यासाठी मध्यस्थी च्या माध्यमातून फाईल प्रस्तावित केल्यास लवकर कर्ज मिळत असल्याचे दिसून आले. परंतु गोरगरीब शेतकऱ्यांना फाईल प्रस्तावित करण्यासाठी ताटकळत दिवसेंदिवस वाट पहावी लागत आहे. ग्राहकच हे देव समजणार्या बँका ग्राहकांना दुरावत असल्याची दुरावस्था अनेक ग्रामीण भागातील बँकांमध्ये पहावयास मिळाली.