मुखेडकरांना दिलासा पण …सोमवारीहीआढळले रुग्ण …पहा किती व कुठे 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
मुखेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण रोजच भल्या मोठ्या प्रमाणात आढळत असून सोमवारी मात्र थोडा दिलासा मिळाला तरीही 3 रुग्ण आढळले आहेत.
     या तीन रुग्णात महादेव मंदीर येथील एकाच कुटुंबातील दोन रुग्ण तर गणेश नगर येथील एक रुग्ण आहेत तर  मुखेड कोव्हीड सेंटर येथे 115 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
     मुखेड तालुक्यातील चित्र पाहिले तर कुठेही कोरोना रुग्ण सापडले असे वाटत नसून कोणत्याच ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळताना दिसून येत नाही.
    अनेक बँकेकडून तर याचा फज्जाच उडाला असून बँकेच्या प्रशासनाकडून नागरिकांची कोणतीच काळजी घेताना दिसून येत नाही.