वळंकीत गावठी दारू जोमात तर तरूण पिढी उद्वस्तीच्या मार्गावर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

बाराहाळी: प्रतिनीधी

देशामध्ये कोरोणासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असुन मात्र मुखेड तालुक्यातील वळंकी गावात गेल्या काही महिण्यांपासुन अवैद्य गावठी दारूला ऊधान आल्याचे चित्र दिसुन येत आहे.

वळंकीमध्ये गेल्या अनेक महिण्यांपासुन या गावामध्ये खुलेआम गावठी दारूची विक्री होत आहे. मात्र पोलीसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असुन, दिवसेंदिवस दारू विक्री मात्र बिनधास्तपणे चालु आहे. त्यामुळेच या गावात अपवादानेच बेकायदा धंदे सुरू असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

संबधीत गावची जबाबदारी असणार्या बीट अमंलदारांना,बेकायदा धंद्याची माहिती असुनदेखील सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने गावातील अवैद्य दारू विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दारूविक्रेत्यांने वळंकी या गावामध्ये चांगलेच बस्तान बसवल्याचे चित्र आहे. बेकायदेशीर होणार्या गावठी दारूच्या एका बिसलरीच्या बाटलीची किंमत सरासरी 100 ते 150 रूपये असुन दारूविक्रेता ईसम हा रोज दुपारचे 3 ते ५ या वेळेमध्ये वळंकीच्या  शेताजवळील पत्रांच्या शेडच्या आस पास/ बिहारीपुर रस्त्याकडे जाणार्या माळाच्या पोटी दारूची विक्री करत आहे.

 

दारूवीक्रेता रोज हजारो रूपये कमवुन मालामाल होत आहे तर, युवक वर्ग सर्रासपणे ऊद्वस्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.

*वळंकी या गावातील होत असलेली अवैद्य खुलेआम दारू विक्रीची बातमी या अगोदरही लोकभारत न्युज या व्रत्तवाहिणीने प्रकाशीत केली होती. मात्र कुठेच कारवाई झाल्याचे चित्र दिसुन आले नाही.*

पोलीस विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने गावातील दारू विक्रीला दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरीकांचे जिव त्राही त्राही झाले असल्याचे नागरीकांमध्ये चर्चा होत असुन लवकरच अशांवर काय्रवाही करण्यात यावी अशी मागणी संतापत सुज्ञ नागरीकांकडुन केली जात आहे.