प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा – डॉ.रणजीत काळे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 

         प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड ची लाभार्थ्यांची आधार लिंक सुरु करा अशी मागणी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष डॉ.रणजीत काळे           यांनी गटविकास अधिकारी सी  एल रामोड यांच्याकडे दि  ०७ रोजी  केली आहे .

तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेचे ४८ हजार लाभार्थ्यांच्या नावाने प्रपत्र ड ची यादी नुकतीच प्रत्येक गावात प्रसिद्ध करण्यात आले असून सदरील यादीप्रमाणे लाभार्थ्याच्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड ऑनलाइन करून घेण्याची मुदत संपण्याच्या 8 दिवस अगोदर सुरू केल्याने 8 दिवसात केवळ १९ हजार लाभार्थ्यांचे आधार कार्ड ऑनलाइन झाली आहेत.

उर्वरित २९ हजार लाभार्थ्यांचे कार्ड प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वंचित राहिले आहेत सदर काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा ऑनलाईन प्रक्रिया सुरु करावी व गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे निवेदनात   नमूद करण्यात  आले  आहे .

यावेळी  युवक काँग्रेस कार्याध्यक्ष डॉ.रणजीत काळे यांच्यासह , शिवाजीराव गायकवाड, जयप्रकाश कानगुले, मारुती घाटे , विशाल गायकवाड, इम्रान पठाण यांची  उपस्थिती  होती .