खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण …..नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

नांदेड : खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण असून नांदेडात कोरोनाने पालकमंत्री,आमदार नंतर खासदारालाही सोडले नाही

अमरावतीच्या खासदारांपाठोपाठ नांदेडचे खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांना हि कोरोना चे संक्रमण झाली आहे, त्यांची तबेत ठणठणीत आहे असून आ. अमर राजूरकर व आ. जवळगावकर हे संक्रमण मधून बाहेर ल्याची पडल्याची माहिती  आहे . तर  या  अगोदर  नांदेड   पालकमंत्री  अशोकराव चव्हाण यांनाही  कोरोनाची  लागण  झाली  होती .

        खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आला असून  औरंगाबाद येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे.  त्यांच्या सोबतचे कॉरनटाईन झाले आहेत

       साहेब आपल्यावर श्री साईबाबा चा आशीर्वाद आहे सर्व ठिक होईल.आई तुळजा भवानी आपल्याला या कोरोना वर मात करण्याची शक्ती देऊन  उदंड आयुष्य देवो हिच मनोभावे प्रर्थना त्यांचे  समर्थक  सुनिल रामदासी यांनी  केले  आहे .


खासदार चिखलीकर यांचे सुपुत्र व नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील यांना अलीकडेच करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर प्रताप पाटील यांचीही करोना चाचणी करण्यात आली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रवीण पाटील हे देखील औरंगाबादमध्येच उपचार घेत आहेत.