तहसील नंतर नगर पालिकेतही कोरोनाचा शिरकाव…. दोन अभियंत्यासह एका लेखापालास कोरोनाची लागण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : संदीप पिल्लेवाड
मुखेड तहसील कार्यालयाच्या पाठोपाठ नगर परिषद मध्येही कोरोनाची शिरकाव झाला असून दोन अभियंत्यासह एका लेखापालास  रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये दि 05 रोजी कोरोनाची लागण झाली आहे
     सकाळीच तहसील मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने तहसील बंद केले तर सायंकाळी नगर पालिकेतील कर्मचारी पॉजीटिव्ह आल्याने प्रशासनातील अधिकारी ,कर्मचारी वर्गात एकाच खळबळ उडाली आहे.