मुदखेड तालुक्यातील बारड येथे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुदखेड

मुदखेड : तालुक्यातील बारड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष बारड येथे उत्साहात साजरे करण्यात आले.अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे विश्वाला प्रेरणा देणारे साहित्य होय यामध्ये अनेक प्रकारचे पात्र अण्णाभाउंनी उभा केले आहेत हे सर्व पात्र मानवाला अनेक प्रकारचे संघर्ष ,लढा करण्यास भाग पाडतात व अण्णाभाऊ चे साहित्य लवचिक नसून ताठर आहे यामध्ये जीवन जगण्याची प्रेरणा देणारे आहेत अण्णाभाऊंचे साहित्य हे जगाच्या २७ भाषांमध्ये भाषांतरीत झालेले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व इतर महामानवांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतीचे प्रतीक असलेला लाल ध्वजाचे ध्वजारोहण भीम नगर येथील ध्वजारोहण गौतम नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले इंदिरानगर येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नरसिंग आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तर लहुजीनगर येथील ध्वजारोहन बारड नगरचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच प्रतिनिधी विलास देशमुख,उपसरपंच बाळासाहेब देशमुख, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, चेअरमन किशोर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले तंटामुक्ती अध्यक्ष नरहरी आठवले,पो.पा.यशवंत लोमटे अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर मुदखेड तालुका अध्यक्ष माणिक कांबळे लोकस्वराज्य आंदोलन तालुकाध्यक्ष पी.जी केदारे महिला अध्यक्षा द्रोपदीताई कांबळे,हिरामण बुरडे,डि.एस. बारडकर,मारोती कांबळे, मारोती वाघमारे, राजू कांबळे, रामदास कांबळे,बंटी कांबळे,मारोती बुरडे, चांदु गायकवाड,यशवंत पवार,अभिषेक कांबळे,रामा कांबळे, रुपेश वाघमारे, नवनाथ एडके, विशाल लोखंडे,देवानंद धुतराज, कपील सोनटक्के,आकाश कांबळे, सुरज ऐडके,विशाल कांबळे, लखन कांबळे, साहेब कांबळे ,अविनाश कांबळे, विश्वजीत कांबळे, ईश्वर कांबळे, स्वप्निल कांबळे, अनिकेत कांबळे, पवन टिप्परसे, सचिन बने, अमोल कांबळे,मोहन कांबळे, रवी एडके ,गोविंद कांबळे आदीची उपस्थिती होती.