वंचित गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडणारा संघर्षशील नेतृत्व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

इतर लेख ठळक घडामोडी राष्ट्रीय संपादकीय

*लोकनेते लोकप्रिय* खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रुपाने वंचित गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडणारा संघर्षशील नेतृत्व नांदेड जिल्ह्याला लाभला आहे.सत्ता सेवेचे साधन असू शकते परंतु लोकांची सेवा करण्याची तळमळ मनात असावी लागते. तो जिव्हाळा तळमळ जनतेविषयी प्रेम, कार्यकर्ताना तळ हाताप्रमाणे जपणं चिखलीकर यांच्या नेतृत्वामध्ये असल्याने अविरतपणे लोकहिताची कामे चालू आहेत. एक पाऊल जनतेमध्ये आणि दुसरे पाऊल प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतात. जनसामान्यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन त्यांची सोडवणूक करण्याची जिद्द आणि हातोटी त्यांच्या अंगी आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी महत्त्वपूर्ण मंजुरी देण्याचे योगदान, नांदेड बिदर रेल्वे मंजुरीसाठी बजेट आणून नांदेडच्या विकासात भर, नांदेडच्या शासकीय दवाखान्यातील अत्यावश्यक व्हेंटिलेटर 80 मंजूर, आंतरराष्ट्रीय योग दिवस नांदेड शहरात प्रथमच, कापूस तूर खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण दिलासा, किव्हळा पाणी साठवण तलाव याचा प्रश्न मार्गी लावला, नांदेड ते मुंबई नवीन राज्यराणी रेल्वे सुविधा सुरू केली, कोरोना संकट काळात संपुर्ण नांदेड जिल्हा स्वतः पाहणी करून धान्य वाटप व मदत कार्य असेल चिखलीकर यांचा पुढाकार हा सरस आणि दिलासादायक ठरला. सत्ता असो किंवा नसो आपल्या ओंजळीतील चांदण दु:खीताच्या ओंजळीत टाकण्याची त्यांची वृत्ती जनमनाचा ठाव घेणारी आहे.

कोरोनाच्या संकट काळात बाहेर गावी अडकलेल्यानां आपल्या गावी सुरक्षित आला पाहिजे. यासाठी चिखलीकर साहेब यांनी प्रयत्न केले. परिस्थिती कोणतीही असो नीती आणि नियती मध्ये किंचितही बदल न करता त्यांचे धोरण आणि कार्य सातत्यपूर्ण चालू असल्याने जनसामान्यांना त्यांचा कायम आदर वाटतो. नांदेड जिल्ह्याचे खरोखरच भाग्य चिखलीकर यांच्या रुपाने एक लोकप्रिय खासदार व आदर्श नेतृत्व आपल्याला लाभले. हे लोकनेतृत्व जिद्द, जनसेवेचा वसा आणि विकासाचा दृष्टीकोन घेऊन यापुढे आपले कर्तृत्व सिद्ध करणार आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध जनसामान्यांच्या मनामध्ये दरवळत राहणार यात शंका नाही. लोकनेते, लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. भविष्यात शोषित, वंचित, गोरगरीब जनतेची सेवा त्यांच्या हातून घडो. सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर त्यांना यश प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

शब्दांकन
*दत्ता पाटील माळेगावे गोजेगावकर*