प्रभू श्रीराम मंदीराबाबत शरद पवार यांच्या त्या व्यक्तव्याचा अक्कलकोट येथे निषेध

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

संपूर्ण हिंदूंच्या आस्थेचं प्रश्न असलेलं प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिराचे भूमिपूजन येत्या 5 ऑगस्टला होण्याचं जल्लोष संपूर्ण हिंदू बांधव करत असतांना “मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का ?” असे प्रश्न महाराष्ट्राचे नेते मा. शरदचंद्रपवार विचारने हे वक्तव्य निषेधार्थ आहे म्हणून अक्कलकोट तालुक्यातील भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करून,राज्य सरकारच्या मंत्र्यांना नवीन गाड्यांना पैसे देऊन कोरोना कमी होणार आहे का ? जर कोरोना कमी होण्यासाठी आपल्याकडे उपाय असेल तर ते राज्यसरकार ला सुचवावा अशी टीका स्वामी यांनी याप्रसंगी केला आणि अक्कलकोट तालुक्यातून जास्तीतजास्त पत्र पाठवण्यासाठी आव्हान ही त्या प्रसंगी त्यांनी केले आहे..!

या प्रसंगी प्रथमेश मसूती, संकेत कुलकर्णी, प्रितम आळंद, सूरज इचगे व कार्यकर्ते उपस्थित होते