तत्त्वनिष्ठता व कार्यतत्परतेचा शिलेदार म्हणजे खा. चिखलीकर

नांदेड नांदेड जिल्हा राष्ट्रीय

 

प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस साजरा होत असताना त्या व्यक्तीचा वाढदिवसा निमित्त त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकणे योग्य राहील. जो व्यक्ती सतत धडपडत व कामात व्यस्त असतो त्या व्यक्तीच्या हातून केलेल्या कार्याचे मूल्यमापन म्हणजे थोडक्यात वाढदिवस होय. आज अशाच व्यक्तिमत्वाचा वाढदिवस म्हणजे खासदार प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर यांचा होय. राजकारणातील तत्त्वनिष्ठता व समाजकारणातील कार्यमग्नता या दोनच शैलीवर जीवन जगताना चे वास्तविक पैलू पाहणार आहोत नांदेड जिल्हा राजकारणचा बालेकिल्ला समजला जातो तसे येथून कै.शंकरराव चव्हाण यांनी नांदेड चे नाव संपूर्ण देशात नेले. खासदार चिखलीकर यांनी ही कै. शंकररावजी चव्हाण यांच्यासोबत बरीच वर्षे काम केल्यामुळे त्यांच्यावर राजकारणात चे संस्कार झालेत. म्हणतात ना राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र व दुश्मन राहत नाही याच उक्तीप्रमाणे खा. चिखलीकर यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक चढ-उतार पार करत भरारी घेतली आहे. मौ. चिखली तालुका कंधार या गावाच्या ग्रामपंचायत सदस्य पासून ते देशाच्या सर्वोच्च लोकसभा येथील आज सदस्य हा प्रवास करताना स्वतःहा बरोबर अनेक समस्यांना तोंड देत आज नांदेड जिल्ह्यात त्यांच्याकडे राजकारणातील एकमेव तत्त्वनिष्ठ व्यक्ती म्हणून पाहिले जाते

राजकारणात विविध पदे मिळाली की माणूस मोठा होतो जोपर्यंत पद आहे तोपर्यंत मान-सन्मान मिळतो. पद गेल की कुणी विचारत नाही पण अशी काही माणस आहेत. त्यांची कीर्ती कायम आसते. काही माणसं चांगलं नेतृत्व आणि कर्तृत्व दाखवणारी दुर्मिळच असतात राजकारणात चांगली माणसं येत नाहीत आणि आली तर टिकत नाहीत अशी एक समज आहे. पण राजकारणी माणसे आहेत जिल्ह्याच्या आणि ग्रामीण भागाचा राजकारण्यांना आदर्श घालून देणाऱ्या काहि व्यक्ती मध्ये खा.चिखलीकर हे ऐकमव आहेत.

*2 वेळा विधानसभा व आता खासदार निवडून येण्याचा बहुमान*

खा.चिखलीकर म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय वेळेचे बंधन कार्यकर्त्या वरचा विश्वासहर्ता राजकारणाची दूरदृष्टी प्रत्येक घटना घडामोडी चा आढावा प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत काम कसे करून घ्यावे याचा परिपूर्ण अभ्यास मतदारसंघातील कोणते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे रस्ते पाणी लाईट ह्याबरोबरच शिक्षण आरोग्य आणि रोजगार यावर सुद्धा सखोल अभ्यास
खा. चिखलीकर हे गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी लोहा कंधार विधानसभा क्षेत्रातून दोन वेळा विधानसभा सदस्य म्हणून भरघोस मतांनी विजयी झाले आहेत जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करुन ते शत-प्रतिशत खरे ठरवुन राजकारणाची दिशा ठरवली नांदेड जिल्ह्याच्या राज्य राष्ट्रीय महामार्ग रेल्वे नांदेड -बिदर साठी पहिल्याच अधिवेशनात बजेट मंजुरी. नवीन रेल्वे नांदेड मुंबई राज्य-राणी. लेंडी धरणाच्या शेतकऱ्याचा मावेजा चा प्रश्न. नांदेड येथील रुग्णासाठी अत्यावश्यक 80 व्हेंटिलेटर केंद्र शासनाकडून मंजुरी. आंतरराष्ट्रीय योग दिवस नांदेड येथे घेऊन जागतिक गिनीज बुकमध्ये नोंद. कापूस- तूर खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा. किवळा येथील पाणी साठवण तलाव मंजूर करून शेतकऱ्यांना पाणी प्रश्नावर महत्त्वाचेयोगदान. कोरोना सारख्या महामारीत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात व मतदारसंघात गरीब जनतेला स्वः खर्चाने धान्य किट वाटप करून गरजुवंताना दिलासा दिला.

नेते किती कर्तुत्ववान आहेत याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात काही प्रकरणे उघड होत आहेत काही विविध कारणातून चर्चेत असतानाच पुढारी म्हटलं की चांगले लोक चार हात लांब राहणे पसंत करतात वायफळ बडबड करणारे कमी नाहीत राजकारणातून करणारे आज पावलोपावली दिसून येतात समानता ही फक्त कागदावरच पहावयास मिळते राजकारणातून विचाराचे कारंजी उडतात राजकारण करताना आपण समाजासाठी काय करतो त्याचे आत्मचिंतन केले जात नाही या मतदारसंघातून आपण निवडून आलो या मतदारसंघासाठी आपण पाच
वर्षात काय केलं याचा लेखाजोखा समोर येत नाही पैसे लावले आणि पैसे कमवणे हा एकमेव दृष्टिकोन राजकारणी मंडळी समोर ठेवतात आजपर्यंतचा नांदेड जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहिला तर राज्यातील आणि देशातील काही ठराविक घराण्याकडे सत्ता आली आहे.काहि प्रस्थापित मंडळींनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना मोठे होऊ दिलं नाही आज राजकारण विकासा पेक्षा अविचाराला जास्त पाठबळ देवु लागलं.

*साधी राहणी उच्च विचार*

खा.चिखलीकर यांचा मला पहिला अनुभव 2005 मध्ये आला मि मुंबई ला काहि कामा निमित्ताने गेलो होतो.मला राहाण्यासाठी ठिकाण माहिती नव्हते.पण आमदार निवास येथे मुक्काम करतात ते माहिती होते पण कोणीही आपल्या ओळखीचे नव्हते मग माझ्या डायरीतील आमदार प्रतापराव पा.चिखलीकर याच्या मोबाईल वर मि फोन केला. त्यांनी माझा आता फोन उचलुन बोलले व मला राहण्याची व्यवस्था करून दिली.मि आ.चिखलीकर यांच्या रुममध्ये जावुन आराम केला.व संध्याकाळी मला आ,चिखलीकर यानी जेवण्याची विचारपूस केली ही गोष्ट माझ्यासाठी खुप महत्त्वाचे ठरली.मि विचार केला मि नायगांव मतंदारसघाचा तरी माझ्याबद्दल एवढी साहानुभुती. मग माझा आणी खा.चिखलीकर त्यांच्यातील संबंध घट्ट झाले. माझा परत शिवसेनेत 2015 मध्ये मी प्रवेश झाला. व तेव्हापासून त्यांच्या सोबत काम करण्याची सधी मिळाली. मला खा.चिखलीकर याचा स्वभाव आणि कार्यपद्धती अतिशय आवडली त्यांनी दिलेला शब्द बोललेले शब्द आणि काम करण्याची कार्यमग्नता अतिशय शिस्तप्रिय एखाद्याला कशा पद्धतीचे वागणूक द्यायची हे मला खा. चिखलीकर यांच्या कडून पाहिल्यानंतर समजते. कारण स्वतःच्या ड्रायव्हरला व आपल्या सोबतच्या सहकार्याला जेवण किंवा नाष्टा केलास का इथपर्यंत विचारपूस करणारे फार कमी आहेत. खा, चिखलीकर हे स्वतःचेच नाही तर आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नाश्ता व चहा ची व्यवस्था साई-सुभाष कार्यालयात केली जाते. आपल्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकांना विचारपुस करुन त्याची आडचण सोडवली जाते. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्या व्यक्तीचे समाधान करणं हा फार महत्त्वाचा विषय आहे आजकाल राजकारणामध्ये एकदा ध्येय साध्य झालं की व्यक्ती सर्व विसरून जाते पण आज खा. चिखलीकर हे सर्वोच्च पदावर असूनसुद्धा कुंठलाही अभिमान. गर्व. मी.पणा या गोष्टी कधीही त्यांच्या शरिराला स्पर्श करू शकला नाही. म्हणून काहि राजकारणाच्या सोबत तुलना करताना एक ही गणितात खा. चिखलीकर हे कधीच बसत नाहीत. कारण ते सामान्यातील सामान्य जनतेच्या हृदयात स्पर्श करून स्वतः चे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक गोष्टीचा त्यांना परिपूर्ण अभ्यास आहे म्हणून ते आज नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकमेव तत्वनिष्ठ ठरत आहेत.

गावचा साधा सरपंच झालं की तो मोठ्या तोऱ्यात वावरत असतो गावचे योजना घशात घालून तो मिळवत असतो राजकारणात चांगल्या लोकांनी आलं पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं पण चांगल्या लोकांची राजकारणात किती किंमत केली जाते हेही कधी तपासून पाहिलं पाहिजे चांगल्या लोकांना लोक निवडून देत नाहीत त्यांचा विचार केला जात नाही विचार पेक्षा जास्त महत्त्व पैशाला आहे,आधी ग्रामपंचायत निवडणूक आली की त्यांना प्रमुखांना दारू आणि मटण खाऊ घालावं मगच निवडून याव.मुळात समाजसेवा आणि चांगले विचार रक्तात असावे लागतात राजकारणात कित्येक लोक आले आणि गेले यांची कधी समाजाने आणि इतिहासाने दखल घेतली नाही ज्यांनी समाजासाठी खूप काही केलं त्याची दखल इतिहास आणि नेहमीच घेतली आहे म्हणून खा.चिखलीकर यांच्या कडे पाहिलं जातं यांच्या आदर्श घेण्यासारखा आहे.

*सुनिल रामदासी*
9423136441