लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व बकरी ईद निमित्त आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वाटप …डॉक्टर काळे यांचा स्तुत्य उपक्रम

नांदेड जिल्हा मराठवाडा मुखेड

मुखेड/ संदीप पिल्लेवाड

तालुक्यातील खराब खंडगाव येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व बकरी ईद निमित्त आरोग्य रत्न डॉक्टर रणजीत काळे यांच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक गणपत चित्ते यांच्या हस्ते आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले आर्सेनिक एल्बम30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झेंडा वंदन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

गावांमध्ये मागील पाच सहा दिवसांमध्ये जवळपास 7 कोरोणा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे व वीस लोकांचा रिपोर्ट बाकी असल्यामुळे अतिशय भीतीचे वातावरण सध्या गावांमध्ये असल्याने नागरिकांनी न घाबरता आरोग्याची काळजी कशी करावी व स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल डॉक्टर काळे यांनी मार्गदर्शन केले व सोबतच रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे अर्सेनिक अल्बम30 गोळ्याचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली व बकरी ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

 

या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार मेहताब शेख पत्रकार संदीप पिल्लेवाड,पत्रकार जय-भीम सोनकांबळे.गावचे उपसरपंच दस्तगीर शेख, एन एस यु आय तालुकाध्यक्ष अविनाश काळे, विश्वजीत काळे, राजू काळे, समाजसेवक परमेश्वर तरटे, गणेश तरटे,शंकर गोरे ,चंद्रकांत कांबळे, पांडू कांबळे, सैलानी शेख, चांद पाशा शेख ,शेख माजिद ,शब्बीर शेख,मधुकर कांबळे ,अशोक कांबळे, चंद्रकांत शिवाजी कांबळे ,मारुती तरटे, बालाजी कांबळे, रामेश्वर तरटे ,संजय कांबळे मालू तरटे ,पंडित कांबळे ,अंकुश चांदु कांबळे, बापूराव तरटे ,तरटे सुधाकर, कांबळे अमोल, कांबळे गोविंद, कांबळे सतीश, कांबळे नागेश, संतोष कांबळे, यादव कांबळे ,माधव गजानन कांबळे, श्रावण तरटे व गावातील नागरिक उपस्थित होते.