जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मुखेड केअर सेंटरला भेट…कोरोना रुग्णांसाठी ….!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  संदीप पिल्लेवाड

नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर यांनी दिनांक एक ऑगस्ट रोजी मुखेड कोविंड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली व रुग्णांच्या गैर सोईबाबतअधिकाऱ्यांना धारेवर धरले व नवीन दोनशे बेड मागणी करण्याचे आदेश दिले आणि कोरोना केअर सेंटर मध्ये योग्य त्या सुविधा पुरविण्याचे आदेश केले.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी शक्ती कदम तहसीलदार काशिनाथ पाटील तालुका आरोग्य अधिकारी रमेश गवाले वैद्यकीय अधीक्षक आनंद पाटील पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर हे कोरोना काळात चांगले कार्य करत आहेत त्याबद्दल मुखेडचे आरोग्यरत्न डॉक्टर रंजीत काळे पत्रकार संदीप पिल्लेवाड विशाल गायकवाड जयप्रकाश कानगुले विश्वजीत काळे व राजू काळे यांच्यावतीने जिल्हाधिकारी साहेबांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.