कै .शंकरराव चव्हाण माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळा दिवशी बु ( भोकर ) शाळेचा शालांत परिक्षेचा (किनवट प्रकल्प कार्यालयातून अनुदानित आश्रम शाळेतून प्रथम)१०० टक्के निकाल

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा भोकर

भोकर : कै .शंकरराव चव्हाण माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळा दिवशी बु ता भोकर जी नांदेड येथील शाळेचा निकाल (किनवट प्रकल्प कार्यालयातून अनुदानित आश्रम शाळेतून प्रथम)१०० टक्के निकाल
भोकर,दिवशी बु . येथील आश्रम शाळेचा शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून सर्वच विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

ग्रामीण भागातील आश्रम शाळेने आपली यशाची उज्वल परंपरा कायम राखीत आपल्या शाळेची गुणवता कायम ठेवली आहे. शासनाच्या आदिवासी विकास विभाग विभागामार्फत अनुदानित तत्वावर चालणाऱ्या आश्रम शाळेचा शासनाच्या नियमानुसार गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.घरची परिस्थिती हलाखीची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदरील आश्रम शाळा जीवनाला कलाटणी देणारे ज्ञानकेंद्र ठरत आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.या वर्षी देखील निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांना शिक्षणाप्रति रुची निर्माण करणारे आश्रम शाळेचे संस्थापक श्री गोविंदराव बाबगौड पाटील साहेब यांचे व मा वरिष्ठ कार्यालयाचे योग्य मार्गदर्शन व सहकार्य,गुरूजनांचे प्रयत्न कामी आले.आगामी काळातही गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे अध्यक्ष श्री गोविंदराव बाबागौड पाटील साहेब व मार्गदर्शक श्री साई पाटील ,प्राचार्य संजय गौड सुधनवार यांनी सांगितले,निकालाची परंपरा कायम ठेवल्या बद्दल समाधान व्यक्त करून सर्व यशस्वी विध्यार्थी यांचे कौतुक केले आहे.मा प्रकल्प अधिकारी श्री वीशालजी राठोड साहेब,मा सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री शेगोकार साहेब,शाळेचे पालक अधिकारी चटलेवाड साहेब,आदींनी विध्यार्थ्यांचे कौतुक केले आहे

शाळेने मिळवलेल्या यशासाठी कोंडलवार सर मुख्यध्यापक रोडगे विलास,पुरी .आर. व्ही,मोटे एच. डी, घुले.एस.ए, चव्हाण .बी .एस ,कांबळे बी .एन ,मोरे .बी .डब्ल्यू ,कोडापे. आर .व्ही,माने.व्ही.डी,शेंडगे. बी. जी, डोंगरे.एस .बी,अकुलवाड.जी.जी,शेंडगे. एस. एस,पालके.जी एन,आदी शिक्षकवृद्ध व सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले