बकरी ईद ; गोवंश हत्येला पाबंद करा – विश्व हिंदु परिषद ची  मागणी  

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : बकरी ईदला हजारोंच्या संख्येने गोवंश हत्या मोठया प्रमाणात केली जाते ही हत्या हिंदु समाजास मान्य नाही त्यामुळे बकरी ईदला गोवंश हत्या पाबंद करा अशी मागणी विश्वहिंदु परिषदच्या वतीने पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्याकडे दि. ३१ रोजी करण्यात आली.

गोवंश हा हिंदु समाजाचा भावनेचा व अस्मितेचा विषय असुन गोवंशाची रक्षा करणे हे हिंदु समाजाची प्रथम जबाबदारी आहे. बकरी ईदला मुखेड शहरात व तालुक्यात मुस्लीम समाजाकडुन मोठया प्रमाणात गोवंश हत्या केली जाते ही हत्या प्रशासनाकडुन रोखून पाबंदी घालावी यावरुनही असे काही निदर्शनास आल्यास संबंधीतावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

 


यावेळी विश्व हिंदू परिषदचे गंगाधर पाटील, विश्वहिंदु परिषद तालुकामंत्री महेश मुक्कावार, शहरमंत्री संजय वाघमारे,बजरंग दलचे शंकर नाईनवाड,भाजपाचे किशोरसिंह चौहाण, साईनाथ बोईनवाड, राहुल कंदमवार आदी उपस्थित होते.