*मुंबईचे माजी मंत्री आ.बाबा सिध्दीकी यांनी दिलेल्या अन्नधान्य किटांचे दोन महिन्यानंतर मुदखेडच्या पत्रकारांना वाटप..!!* अनेकांच्या किटांमध्ये किडे,मुंग्या,जाळ्या…..!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुदखेड

नांदेड : मुदखेड येथे कांग्रेसचे नेते तथा मुंबईचे माजी मंत्री आ.बाबा सिध्दीकी यांच्या सहकार्यातुन तालुक्यातील वृत्तपत्रे विक्रेते आणि पत्रकारांना अन्नधान्याच्या किट वाटप करण्यात आले आहे.
दि.२७ जुलै सोमवार रोजी कांग्रेसच्या काही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तालुका पक्ष कार्यालयात अन्नधान्य किट वाटपाचा कार्यक्रम घेतला.

सदरील किट या मुबंईचे माजी मंत्री आ.बाबा सिध्दीकी यांनी दोन महिन्यापुर्वी गोरगरीबांना वाटप करण्यासाठी पुरवठा केल्याची प्राप्त माहिती आहे.परंतु काही तालुक्यातील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी गोरगरिबांच्या किटवर डल्ला मारून वाटाघाटी करून स्वतः कडे ठेवून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. आणि त्याच किटा ह्या पत्रकारांच्या डोळ्यांत धुळफेक करत पेपरात बातम्या, आपला फोटो यावा,उदोउदो व्हावा या हेतूने दर्जाहिन किट पत्रकारांना वाटप करण्याचा खटाटोप केला…
हा खटाटोप पाहून अनेक पत्रकारांना सुन्न,गरिबांची चेष्टा करणारा अनुभव आला.हा सर्व प्रकार कशासाठी? का? असा सवाल आता निर्माण झाला आहे. कारण पालकमंत्री यांना मुदखेडच्या पत्रकारांसाठी मुबंई आणि बाबांच्या कीटांची निवड ? पालकमंत्री महोदयांना नांदेडहून किट खरेदी करता आल्या असत्या ना? मग हा उद्योग कशासाठी; हा विषय संपूर्ण मुदखेड तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे… !!
सदरील अन्नधान्य किटांचे वाटप तालुका कांग्रेस कार्यालयात पक्षाचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या पुढाकारांने मुदखेड तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेते व पत्रकारांना करण्यात आले.यावेळी जेष्ट पत्रकार मनोज कमठे साहेब,वृत्तपत्रे विक्रेते रामू गुडमलवार,चंद्रे मामा,तसेच म.रा.म.पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर,कार्याध्यक्ष दिनेश शर्मा,पत्रकार संवरक्षण समिती तालुकाध्यक्ष सचिनकुमार कांबळे,अ.भा.परिषद
तालुकाध्यक्ष शेख जब्बार,प्रल्हाद मस्के,पिराजी गाडेकर,नामदेव राहेरे,संजय कोलते,ईश्वर पिन्नलवार आदिसह अनेक जण उपस्थित होते.