मुखेडात कोरोनाचा कहर सुरुच…रविवारी 18 रुग्ण आढळले तर नांदेड जिल्हयात 72 रुग्ण आढळले….या ठिकाणी ..!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

मुखेड –  मुखेड तालुक्यात कोरोनाचा कहर चालुच असुन दि. 26 जुलै रोजीच्या सायंकाळी 5 वाजताच्या अहवालात 18 कोरोना रुग्ण सापडले आहेत.

या रुग्णात फुले नगर मधील 2 , धोबी गल्ली 5, शिवाजी नगर 2, आंबुलगा 2, वडगांव 2 , जाहुर 3 , संत गाडगेबाबा नगर 1 व खरब खंडगांव येथे 1 असे 18 रुग्ण सापडले असुन तालुक्यात रोजच कोरोनाचा कहर सुरु असुन नागरीकांत अत्यंत भीतीचे वातावरण आहे.

आज नांदेड जिल्हयात 72 रुग्ण सापडले असुन जिल्हयात 1 हजार 324 रुग्ण संख्या झालेली आहे तर आज एकाचा मृत्यू झाला आहे.