सुधाकर पाकलवाड यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड:  पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा या गाव चे सुपूत्र मा .सुधाकर हणमंतराव पाकलवाड यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2020 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा नाशिक येथे दि 29 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.सुधाकर पाकलवाड हे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी (अहमदनगर) येथे 9 वर्षे शिक्षक म्हणून सेवा केलेे व सद्यस्थितीत आसखेडा (नाशिक)या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.सुधाकर
पाकलवाड सर यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी (अहमदनगर) व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा (नाशिक) येथे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले.तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले स्पर्धा परीक्षेसाठी मोलाचे योगदान दिले.अनेक उपक्रमात सहभाग नोंदवला.अनेक शैक्षणिक कार्यशाळेत त्यांनी चांगली भूमिका बजावली.या सर्व कार्याची नोंद घेत मुंबई मनुष्यबळ विकास अकादमीने त्यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार दिला आहे.