छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये अपमान करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा – डॉ काळे 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
      छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये अग्रीमा जोशुआ या युवतीने केला असून अपमान करणाऱ्या विरोधात तात्काळ  गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी असे मुखेड युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष  डॉ. रणजित काळे यांनी दि 11 रोजी तहसीलदार काशीनाथ पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
 महाराष्ट्रामध्ये जर महामानवांचा अपमान होत असेल तर तो कदापी सहन केल्या जाणार नाही . यापूर्वीही अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा व महामानवांचा अपमान केला त्यांना शिवप्रेमी वेळोवेळी जागा दाखवून दिली असे जर वारंवार होत असेल तर त्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी कठोरातील कठोर असा कायदा करून त्यांना शिक्षा करावी जेणेकरून भविष्यामध्ये कोणी महामानवांचा अपमान करणार नाही व अपमान करणाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा एकही शो चालू देणार नाही असा इशाराही या निवेदनात दिला आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरोग्यरत्न डॉ. रणजीत काळे यांच्यासह  सुरेश पाटील बेळीकर, सुनील आरगीळे ,  विशाल गायकवाड , इम्रान पठाण, जयप्रकाश कानगुले,  आकाश कांबळे, रियाज शेख,  भारत सोनकांबळे , असद बल्की , पप्पू पायरे आदी उपस्थित होते.