काटकळंबा येथे गावाची तपासणी व निरजंतूकीकरण

कंधार ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

प्रभाकर पांडे 

दि.११/७/२०रोज शनिवार काटकळंबा हे गाव कोविड-१९बाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या कारणाने गावात या पुर्वी ग्राम पंचायत कार्यालय काटकळंबा च्या वतिने संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला व गावातील संपूर्ण मेडिकल वगळता पुर्ण मार्केट लाॅकडाऊन करण्यात आले आहे .

 

यामध्ये पोलीस स्टेशन उस्माननगर मार्फत सर्व गावांत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जमावबंदी लागु केली लाॅकडाऊन मध्ये संपूर्ण गावकरी, अधिकारी, पदाधिकारी यांच्या सुचनेनुसार पालन करित आहेत सध्या गावकऱ्यांमध्ये कोविड १९ च्या बाबतीत भयभीत वातावरण झाल्यामुळे गावकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेऊ नये अती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना माक्स, रूमाल, लाऊन बाहेर पडावे सोशल डिशटिंन्गचा नियम पाळावा वारंवार हात साबणाने किंवा हॅन्डवाॅश,सनिटायझर योग्य पध्दतीने वापर करत जावें असे ग्रा.पं.का.काटकळंबाच्या वतीने दंवडी, आॅलसिंग द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

 

गावात कोणालाही सर्दी,ताप, खोकला यांची लक्षणे आढळुन आल्यास आरोग्य उपकेंद्र काटकळंबा येथे जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येते आहे.या कोरोणा रोगांवर मात करण्यासाठी आज रोजी प्रा.आ.कें.बारुळचे वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश दुलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.उपकेंद्र काटकळंबाचे अधिकारी डॉ विरभद्र कापसे साहेब यांच्या सहकार्याने आ.सा.शिखरे साहेब, नरवाडे मॅडम,श्री.गालशेठवार ,आ.कर्मचारी श्री.एकाळे,श्री.धोंडगे, श्री.गोडबोले,श्री.जाधव,श्री.भांड,आ.सेविका, शेवाळे मॅडम, जोंधळे मॅडम, तसेच अंगणवाडी कर्मचारी सौ.गयाताई बस्वदे,उज्वला रेड्डी, कविता पांचाळ,सत्यभामा हाम्पले मदतनीस जैतुनबि शेख सकिनाबी शेख यांनी गावात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली या कामी ग्राम पंचायत कार्यालय काटकळंबा सरपंच सौ अनिता राष्ट्रपाल चावरे उपसरपंच गोविंदराव वाकोरे ग्राम पंचायत सदस्य साईनाथ कोळगीरे, शंकर गोरकवाड, मारोती बस्वदे, शिवाजी पानपट्टे,मोहन पानपट्टे, ईब्राहिम सय्यद,प्रल्हाद मोरे अशोक चावरे,जळबा कांबळे, आणि ग्रामविकास अधिकारी एन.डी.सोनकांबळे,तालाठी एस जाधव,पो पा.अमोल बस्वदे,त.मु.बालाजी पानपट्टे, पोलिस स्टेशन पो.ज.बि.एन.बोकारे,पी.एस.गजगे ग्रा.पं.कर्मचारी बालाजी कन्नेवार,आप.सय्यद,ग्रा.रो.शे.शिवाजी बस्वदे हे अधिकार्यांच्या आदेशा प्रमाणे आपली सेवा बजावत आहेत तरी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे