शाळा ,काँलेज नियमितपणे कधी व कशा सुरू होतील विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण विद्यार्थी व पालकांनी दिल्या लोकभारत न्युज ला प्रतिक्रीया

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

देशभरात कोरोना विष्णू कोविड 19 थैमान घातल्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होऊ शकतील यासंबंधी अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसुन येत होते त्यामुळे लोकभारत न्युज चे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी पालक व विद्यार्थांनशी संवाद साधले असता पालक व विद्यार्थांनी लोकभारत न्युज ला दिलेल्या प्रतिक्रीया.


मुलांची अभ्यासाबद्दल ची गोडी कमी झाली आहे.कारण शिक्षकांचा धाक नाही. आणि पालकांच्या तोंडून ते नेहमीच असतं की कोरोना गेल्या शिवाय शाळा सुरू होणार नाही.तस ऑनलाइन क्लास सुरू झाली आहेत.पण आपण नेहमी मुलांना फोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो.पण आज अशी वेळ आली आहे की आपणच म्हणतो. क्लास ची वेळ झाली. म्हणून फोन मुलांना द्यावा लागत आहे .तरी नुकसान तर होतच आहे मुलांच पण जिवा पेक्षा जास्त काहीच नाही.

पालक – सविता संतोष मुपडे


तूर्तास तरी शाळा चालू करणे हा विचार सुद्धा आणू नये कारण दिवसेन दिवस कोविड -19 हा वाढतच आहे. राहिला प्रश्न

मुलाचं, पालकांनी शक्य होईल तेवढे मुलांना चांगल्या कामात गुंतवून ठेवणे आणि पाट्यापुस्तकाशी जवळीक ठेवायला हवी. शिक्षणापेक्ष्या स्वतःचा आणि आपल्या पाल्याचा जीव खूप महत्वाचा आहे असं मला वाटत.

– पालक – नितिन चल्लावाड


शाळा कॉलेज सुरु करणे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खुप धोक्याचे आहे कारण या ठिकाणी विद्यार्थी एकत्र येवून शिक्षण घेत असतात त्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढु शकतो पुढे चालुन कोरोना चे केंद्र ही बनु शकते.त्यामुळं शाळा कॉलेज चा विचार आताच करण म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे होईल.राहीला प्रश्न विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ते घरी घेऊ शकतील शासनाने त्यांना पुस्तक दिली आहेत.त्या व्दारे पालकांनी आपल्या मुलांचा अभ्यास घेणे गरजेचे आहे. काही अडचणी असतील तर मोबाईल व्दारे आपल्या शिक्षकांना विचारु शकतात.

– प्रशांत अशोकराव गायकवाड सहशिक्षक
मानव्य विकास विद्यालय देगलुर


नांदेड जिल्ह्यातील सर्व नर्सिंग स्टुडंट्सचे लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावेत.कारण त्यांना ढकलपास करु नये कारण त्यांनी माणसांच्या जिवाशी काळजी घेतात, आरोग्य विषयक अभ्यास करुनच उपचार करावे लागते.अगोदरच रुग्ण वरच्या वर वाढत आहेत त्यामुळे ज्यांचे कोर्स पूर्ण झाला नाही त्यांना ड्युटीवर घेऊन काही उपयोग नाही कारण नेमका महत्वाचा अभ्यास नसतोच ते जर परिक्षा मधुन पास झाले तर नर्सेस महत्वाचे असतात. सरकारला विनंती करतो नर्सिंग स्टुडंटचे परिक्षा घेण्यात यावी…

– ब्रदर.आदी बनसोडे


कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे,देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिड कोटीच्या वर गेली असुन,राज्य शासनाने सद्यस्थितीत शाळा महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्था सुरू केल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाहीत. लहान मुलांची प्रतिकारक क्षमता कमी. असल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. शासनाने सध्या ऑनलाईन शिक्षणावरच अधिक भर देण्याची गरज आहे.

– योगेश पाटील शिंदे डोरनाळीकर


सध्याची परिस्थिती पाहता शाळा कॉलेज चालू होणे शक्य नसून तसेच परिस्थिती पाहता वर्ग भरू नये..अभ्यासाचा विषय पाहता शक्य असेल तेवढं मुलांना पालकांनी घरीच अभ्यास घ्यावा. जर पालक अशिक्षित असतील तर इंटरनेट चा वापर करून मुलांचा अभ्यास घ्यावा.. जर मोबाईल किंवा इंटरनेट ची सोय नसेल तर एक चांगला पर्याय म्हणजे लॉकडाऊन् मुळे गावात काही आपले उच्चशिक्षित तरुण गावात आहेत..त्यांना काही पैश्याची मदत करून गावातच काही मुलांचा अभ्यास करून घ्यावा..असे काही गावातील तरुण उभारून सोय होऊ शकते.

– महाविद्यालय विद्यार्थी – साईनाथ गोविंदराव पाटील


शाळा कॉलेज चालु केल पाहीजे कारन चालु जिवनात मोबाईल चा अतिवापर होत चालला असल्याने लहान मोठ्या मुलाच्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतो.जे गरीब होतकरु विद्यार्थी आहेत मोलमजुरी करुन स्वताच शिक्षण पूर्ण करण्यासाठी झटत अाहे.अशा मुलांकडे कुठुन येईल लॅपटॉप,मोबाईल गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खुन होत चालला आहे लवकरात लवकर कॉलेज चालु व्हावे अशी अपेक्षा आहे.

– महाविद्यालय विद्यार्थी – कृष्णकांत वाडेकर


शाळा महाविद्यालय चालू झाले तरच चागंले आहे घरी अभ्यास होत नाही अभ्यासावरती लक्ष राहत नाही.महाविद्यालय विद्यार्थीनी – आउलवार गोदावरी शामराव


जो पर्यंत कोरोनावर लस येणार नाही तोपर्यंत प्राथमिक शाळा व शिक्षण बंद असायला हवे.
पण महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठे असल्याने त्यांची सम विषम संख्या आधारित मुलांना बोलवून अध्यापन केलं पाहिजे. त्यात सोशल डिस्टन्स व इतर नियमावली विद्यार्थ्यांना सांगून काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे .तसेच विद्यार्थी बसण्याची जागा दररोज सँनीटाईझ करावी ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत आजही आपल्या ग्रामीण भागात 80% पालकांकडे अँन्डरोईड मोबाईल नाहीत.त्यामुळेच ऑनलाईन शिक्षण नावालाच आहे.तसेच शैक्षणिक सत्र 15 जून ऐवजी 1 सप्टेंबर पासून चालू करावे.

– शिक्षक नागेश गोविंदवाड


शाळा व महाविद्यालय सुरू करण्यात यावे परंतु नियमांचे पालन करणे हे ही लक्षात घ्यायला हवं नियमांचे पालन करून शाळा व महाविद्यालय सुरू करण्यात यावे.

महाविद्यालय विद्यार्थी नारायण बोन्तेवाड


जिवंत असेल तर सर्व काही अन्यथा सर्व व्यर्थ कोरोना अटोक्यात येई पंर्यत शाळा – महाविद्यालये चालू करणे बेजबाबदारीचे घातक ठरू शकते त्यामुळे सद्या शाळा नकोच पालकांनी पाल्याचा घरीच अभ्यास घ्यावा .शाळेत विद्यार्थी एकत्र येणारच का लहान मुलांचा जिव धोक्यात घालायचा जिवंत असलोत तरच शिक्षण घेता येईल विकास करता येईल .त्यासाठी हे वर्षे फक्त जिवंत राहण्याचे आहे. त्यामुळे शाळा नकोच.

सुर्यकांत ईश्वरराव आल्लडवाड माजी प्राचार्य विद्या विकास .म .वि .बाह्राळी


शाळा बंद ठेवले तर चांगले राहिल कारण प्रत्येक शाळेमध्ये एकाच गावचे विद्यार्थी नाही राहत आणि एखादा जरी कोरोना पाँझिटीव्ह असेल तर त्याच्या संपर्कातील सर्व विद्यार्थांना कोरोना होऊ शकते . त्या विद्यार्थामुळे पुर्ण गावाला होऊ शकते त्यामुळे शाळा बंद च ठेवले पाहिजे .

महाविद्यालय विद्यार्थीनी पाटील मयुरी


लाँकडाऊन मुळे विद्यार्थ्यी खुप बोर झाले आहेत त्यांच अभ्यासावर लक्ष दुर होत चाल आहे मुल इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.शाळा टिव्हीशेन बंद असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शाळा चालू केले पाहिजे पण त्यांची काळजी पण घेतली पाहिजे सोशल डिस्टन्स राहिले पाहिजे शैक्षणिक काळजी बरोबर आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे.

महाविद्यालय विद्यार्थीनी – स्वरूपा येलमेटवाड


मुलांना दररोज एक तास तरी घरी अभ्यास करून घ्यावे पालकांनी कोरोना कालावधी मध्ये मुलांन कडे लक्ष द्यावे.

एकनाथ पडलवार