मुक्रमाबादेत कोरोना चा शिरकाव …एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुक्रमाबाद – दत्त्ता पाटील माळेगावेे

मुक्रमाबाद येथील एका व्यक्तीचे स्वँब पॉझिटिव्ह आले असुन त्याच्यावर उदगीर येथील कोव्हिड सेंटर मध्ये उपचार सुरु आहे.संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील अकारा जणांना तपासणी साठी मुखेड येथील कोव्हिड सेंटर येथे घेऊन गेले असुन मुक्रमाबाद शहरात कोरोना ने शिरकाव करुन खाते उघडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील एक व्यक्ती दोन दिवसापुर्वी आजारी पडला होता त्या व्यक्तीला ञास होत असल्याने त्याला उपचारासाठी उदगीर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता त्याचा स्वॕब नांदेड येथे पाठविण्यात आले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाचा स्वँब पॉझिटिव्ह आल्याने मुक्रमाबाद येथील आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या यंञणेत खळबळ माजली आहे. त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील अकरा जणांना दि.९ रोजी मुखेड येथील कोव्हिड सेंटर येथे तपासणी साठी घेऊन गेले असुन त्या अकरा जणांचे स्वँब नांदेड येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी रमेश गवाले.यांनी दीली आहे.
यावेळी पोलीस ठाण्याचे स.पोनी.कमलाकर गड्डीमे व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश गायकवाड रावीकर, आरोग्य कर्मचारी नागनाथ दमकोंडवार यांनी त्या ठिकाणचे प्रत्यक्ष पाहणी करुन पॉझिटिव्ह रुग्णाच्या आसताना गल्ली येथील घराकडील संपुर्ण परिसर व रस्ता सील करुन तो परिसर कंन्टेंन्मन झोन (प्रतिबंधित क्षेञ)म्हणून घोषीत केले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेण्यात आली.या बैठकीत मुक्रमाबाद पोलीस ठाण्याचे स.पो.नी.कमलाकर गड्डीमे, सरपंच प्रतिनिधी शिवराजअप्पा आवडके, सुभाषअप्पा बोधने, सुरेश पंदीलवार आदीनी चर्चा केली या चर्चे दरम्यान संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्णय घेतले असुन त्यानंतर काही तासातच संपुर्ण मुक्रमाबाद शहर पोलीस प्रशासनाकडुन सुचना देऊन बंद करण्यात आले आहे.यावेळी शहरात विनाकारण फिरणा-या व विना मास्क फिरणा-या वर व कोरोना संबंधी कुठल्याही प्रकारची खोटी माहिती पसरविण्यावर कारवाई करण्यात येणार असुन नागरिकांनी आपल्या घरातच राहुन आपली व परिवाराची काळजी घ्यावे असे अवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक कमलाकर गड्डीमे यांनी केले आहे.