धक्कादायक : मुखेडात एका वर्षाच्या मुलीसह एकाच दिवशी 13 रुग्ण आढळले … मुखेडने गाठले अर्धशतकाचा आकडा..

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप  पिल्लेवाड

मुखेडात एकाच दिवशी दि. 09 रोजी सायंकाळच्या अहवालात 13 रुग्ण आढळले असून या अहवालाने मुखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर मुखेड तालुक्यात आतापर्यंत 50 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

शहरातील व्यंकटेश नगर येथील व्यक्ती हायवे चे काम करणाऱ्या  कंपनीत सिक्युरीटी गार्ड म्हणुन कामाला असुन त्या व्यक्तीस व त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असुन शहरातील पोलिस कॉलनी येथील एकाच कुटुंबातील अकरा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात पुरुष वय 45,43,16,3 व 27 वर्ष आहे तर महिला वय 1,35,43,13,28 व 30 अशा सहा महिलांना कोरोना झाला आहे.