मुखेडात चार नवीन रुग्ण आढळले ; दोन दिवसात नऊ रुग्ण     मुखेड तालुक्यात रुग्णांची संख्या ३७  वर पोहचली.. ….. नियम पाळा अन्यथा कार्यवाही – तहसिलदार पाटील

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यात दि. ०८ रोजीच्या सायंकाळच्या अहवालात चार नवीन रुणांची भर पडली असुन दि. ०७ रोजी पाच नवीन रुग्ण आढळले होते मुखेड तालुक्यात दोन दिवसात नऊ रुग्ण तर आत्तापर्यत ३७ रुग्णांची नोंद झाली आहे.

दि. ०८ रोजीच्या रुग्णांत शहरातील तगलाईन गल्ली येथील ३ रुग्ण आढळले असुन यात एक पुरुष वय ३४ वर्ष व दोन महिला वय २१ व लहाण मुलगी १० वर्ष तर शिवाजी नगर येथील एक पुरुष वय १७ वर्ष असे रुग्ण आहेत. या रुग्णांच्या परिवारात अगोदरच रुग्ण सापडला असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला दि. ०८ रोजी यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला हे चारही रुग्ण एकाच कुटूंबातील असल्याचे समजते.

कोरोनाची नियमावली तोडणाऱ्यास प्रशासनाकडून दंड

जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी नेमून दिलेली कोरोनाची नियमावली तोडणाऱ्या  दुचाकी,तीनचाकी यांना दंड ठोठावण्यात आला. या पथकात तहसिलदार काशिनाथ पाटील, पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोलिस निरीक्षक गणेश चित्ते, नपाचे बलभिम शेंडगे यांच्यासह आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

………….. नियम पाळा अन्यथा कार्यवाही – तहसिलदार पाटील

जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेल्या मिशन ब्रोक चेनच्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास त्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. तर दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहक दिसल्यास पाच हजार रुपये दंड व पुढील पाच दिवसासाठी दुकान सील करण्यात येईल त्यामुळे नियमाचे पालन करावे असे तहसिलदार काशिनाथ पाटील म्हणाले.
……………………….
गर्दी कमी होण्याचे नाव नाही…
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुखेड तालुक्यातील बाजार पेठ, मोंढा अशा ठिकाणी गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.