धक्कादायक ; मुखेडात पाच नवीन रुग्ण वाढले ; अर्धशतकाकडे वाटचाल !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यात दि. 07 रोजी पाच नवीन रुणांची भर पडली असुन मुखेडात कोरोना रुग्णाची वाटचाल अर्धशतकाकडे होत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील दत्त नगर येथील एकाच परिवारातील 3 तर इतर एक व दामला तांडा येथील 10 वर्षाचा मुलगा असे पाच रुग्ण आढळले असुन एकाच दिवशी पाच रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. या पाच रुग्णापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.