लेंडी प्रकल्पाच्या मावेजावरुन भाजपा – कॉग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई !  मावेजा वाटपापासून गोजेगावकरांना ठेवले  दुर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पग्रस्त १ हजार ३१० लाभार्थ्यांना मावेजा वाटपावरुन भाजपा – कॉग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई लागल्याचे चित्र मुखेड तालुक्यात दिसत आहे.

दि. ०६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री अशोकराव चव्हण व आमदार डॉ. तुषार राठोेड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्यासह इतर जनांच्या हस्ते मावेजांचे चेक वाटप करण्यात आले. हे चेक वाटप व लेंडी प्रकल्पग्रस्तांना दोन्ही पक्षाने आपणच न्याय दिला असे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.तालुक्यातील लेंडी प्रकल्पावर अनेकांनी राजकारण केले व आपआपल्या ज्या त्या वेळी पोळी भाजुन घेतल्या  प्रकल्पग्रस्तांनी अनेकवेळा आंदोलने केली, रास्ता रोको केला शासन दरबारी आपल्या मागण्या नेहमी ठेवत राहिल्या पण काही सर्व सामान्य प्रकल्पग्रस्तांनी जीवाची बाजी लावली पण  भाजपा – कॉग्रेसच्या या श्रेयवादाच्या लढाईत ते अदृश्य झालेले दिसत आहेत.

मुखेड तालुक्यातील मौजे गोणेगाव येथे लेंडी नदीवर सन १९८६ रोजी धरण बांधण्यास सुरवात झाली होती तेंव्हा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते १९८६ ला प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाची ५४ कोटी रुपये रक्कम होती पण सध्या ती रक्कम २२०० कोटी रुपये पर्यंत गेली आहे. गेल्या तीन दशकापासुन वेगळ्या कारणामुळे या प्रकल्पाचे काम रखडलेले आहे.

स्व .माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते धरणाचे  उद्घाटन झाले अन सध्या राज्यात मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री म्हणुन त्यांचेच संपुत्र अशोकराव चव्हाण असल्याने या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास जाईल अशी आशा येथील नागरीकांना आहे पण लेंडीभोवती जे राजकारण फिरत आहे याचेच नुकसान आत्तापर्यंत येथील नागरीकांना झाले आहे यामुळे राजकाण न करता जनतेच्या हितासाठी हा प्रकल्प पुर्ण व्हावा अशी भावना येथील नागरीकांनी व्यक्त केली.

गोजेगावकर यांना ठेवले दुर !

   भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा मुखेड तालुक्यातील राजकारणात दबदबा असलेले  जि.प. सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांना लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या मावेजा वाटपाच्या कार्यक्रमापासुन  दुर ठेवण्यात आले. मुक्रमाबाद जि.प. सदस्या त्यांच्या सुनबाई सौ. अश्विनी पाटील गोजेगावकर असुन त्यांना सुध्दा या कार्यक्रमापासुन अलिप्त ठेवण्यात आले. व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी अनेकवळा लेंडी प्रकल्पासाठी शासन दरबारी प्रश्न मांडले आहेत पण त्यांना दुर ठेवल्यामुळे तालुक्यातील राजकारणाला येणा­ऱ्या  काळात वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


         प्रकल्पग्रस्तांची रक्कम दिड वर्षापुर्वीच आलेली असुन रक्कम वाटपास खुप उशीर झाला आहे.लाभार्थ्यांना रक्कम उशीरा वाटप झाली यात कोण कमी पडले याचे त्यांनी स्वतः आत्मपरिक्षण करणे गरजेजे आहे.शासन दरबारी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडणे आपले काम आहे ते आपण करणार.

          व्यंकटराव पाटील गोजेगावकर,

            भाजपा जिल्हाध्यक्ष, नांदेड