मुखेड शहरात आढळला कोरोना रुग्ण, धाकधुक वाढली ……… ग्रामीण भागासह शहरात कोरोना प्रसार

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड शहरात तगलाईन परिसरातील कोरोनाचा दि. ०६ रोजी पुरुष वय ६५ वर्ष रुग्ण आढळला असुन ग्रामीण भागासह शहरातही कोरोना प्रसार होत असल्याने पुन्हा नागरीकात धाकधुक वाढली आहे.

शहरातील या रुग्णास थोडा त्रास होत असल्याने शहरातील खाजगी दवाखाण्यात तपासणी गेला असता डॉक्टरने त्या रुग्णास नांदेड येथे खाजगी दवाखाण्यात पाठविले. नांदेड येथील खाजगी दवाखाण्यात या रुग्णाने तपासणी केली असता त्यास लक्षणे दिसत असल्याने शासकीय रुग्णालय नांदेड येथे या रुग्णास दाखल करण्यात आले त्याचा कोरोना स्वॅब घेतला असता दि. ०६ रोजी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला.