निसर्ग,सामाजिक,पर्यावरण,प्रदुषण निवारण मंडळाच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी आल्लडवाड यांची निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड /  पवन जगडमवार

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुर्यकांत आल्लडवाड याची निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सुर्यकांत आल्लडवाड हे विद्या विकास विद्यालय बाह्राळी ता.मुखेड येथे २१ वर्ष शिक्षक व नंतर ९ वर्ष मुख्याध्यापक पदावर सेवा केली व सप्टेबर २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले.भाजपासह विविध सामाजिक संघटनात त्याचा सहभाग होता.मराठवाडा शिक्षक संघाचेही अनेक वर्ष कामे केली तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नांदेड व जिल्हा शिक्षण मंडळात जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणुन महत्वाची भुमिका बजावली आहे. याशिवाय १९९६ मध्ये भाजपा तालुकाध्यक्ष व अनुसुचीत जमाती भाजपा जिल्हाध्यक्ष राज्य परिषद सदस्य अशा विविध पदावर विशेष कामगिरी केली याशिवाय बापशेटवाडी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन म्हणुन व संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मुखेडचे सदस्य म्हणुन जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे ते एक प्रयोगशिल आधुनिक शेतकरी आहेत. त्यांनी शेतात पेरु,सागवान, आंबा,जांभुळ,मोसंबी,शेवगा,नारळ इत्यादी वृक्षाचे नंदणवण केले. त्यामुळे त्याना क्रषी विभागाकडुन पुरस्कार पण देण्यात आले होते याच कामाची दखल घेवुन त्याची निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या मुखेड तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात आली.