प्रधानमंत्री पिक विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलै

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

 

नांदेड : दि. 3 :- जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2020-21 साठी खरीप ज्वारी, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेत पिक विमा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार 31 जुलै 2020 दिली आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात खरीप हंगाम 2020-21 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील पिकांसाठी बंधनकारक होती. यावेळेस शेतकऱ्यांना ऐच्छिक केली आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गीक आपत्ती आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे राहील. ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस पिकासाठी जोखीम स्तर 70 टक्के आहे. ज्वारी पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, विमा हप्ता दर 24 टक्के, विमा हप्ता रक्कम 6 हजार रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 500 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 750, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 750 रुपये.
सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये, विमा हप्ता दर 30 टक्के, विमा हप्ता रक्कम 13 हजार 500 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 900 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 14 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 6 हजार 300, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 14 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 6 हजार 300 रुपये.
मूग पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, विमा हप्ता दर 24 टक्के, विमा हप्ता रक्कम 4 हजार 800 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 400 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 200, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 200 रुपये.
उडीद पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, विमा हप्ता दर 26 टक्के, विमा हप्ता रक्कम 5 हजार 200 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 400 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 12 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 400, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 12 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 400 रुपये.
तूर पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, विमा हप्ता दर 27 टक्के, विमा हप्ता रक्कम 9 हजार 450 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 700 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 12.5 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 4 हजार 375, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 12.5 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 4 हजार 375 रुपये.
कापूस पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये, विमा हप्ता दर 19 टक्के, विमा हप्ता रक्कम 8 हजार 550 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 5 टक्के, विमा हप्ता रक्कम 2 हजार 250 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 7 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 3 हजार 150, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 7 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 3 हजार 150 एवढी रक्कम आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.