भोकर तालुका येथेल ग्रामीण रुग्णाल्यात मध्ये आदिवासी विकास ( असो )संघातर्फे केला गेला गौरव

नांदेड जिल्हा भोकर

भोकर : विजय मोरे

आदिवासी विकास (असो ) संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित भोकर ग्रामीण रुग्णालयात येथील मान्यवर साहेब वैधकिय अधिकारी मा,श्री,अनिलसर मुंडे व रुग्णालय स्टाफ यांना कोरोना सेवा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आले.

 

त्यांनी लॉकडाउन काळामध्ये त्यांनी गोरगरीब व गरजु लोकाना अन्न धान्य पुरवठा केला व त्यांनी ग्रामीण रुग्णालयात कोरोना पेशन्ट यांची काळजी घेतली व भोकर तालुक्यातील नागरिकाची आरोग्य तपासणी आपल्या जीवाची परवा नकरता घेतली व आओ रात्र नागरिकांना सहकार्य केले व तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित राबवुन अशाप्रकारे त्यांना अनेक समस्याला त्यांना समोर जावे लागले भोकर ग्रामीण रुग्णालयातल्या,सर्व स्टाफ यांनी पेशन्ट ची काळजी व कार्य करु लागले व आता पण करत आहेत म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आदिवासी विकास असो संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना सेवा सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले .

 

संस्थापक अध्यक्ष श्री,मोतीलाल जी सोनवणे सर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री,संजयभाऊ कोळी,यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास ( असो) संघटना महाराष्ट्र राज्य चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजय पांडुरंग मोरे यांच्या हस्ते व भोकर मान्यवर साहेब ग्रामीण रुग्णालय चे वैधकीय अधिकारी साहेब मा,श्री,अनिल जी मुंडे साहेब व ग्रामीण रुग्णालयात पुर्ण स्टाफ यांना कोरोना सेवा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आले या वेळी भोकर तालुका प्रहार जन शक्ती पक्ष भोकर तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ शिरळवार व कोळी राष्ट्र संघ भोकर तालुका अध्यक्ष व कोळी बांधव उपस्थित होते…..