मुखेड : पवन क्यादरकुंटे
बँका कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देत नसून कर्जासाठी गरज नसतांना पिककर्जासाठी अडवणूक करून व अवाजावी कागदपत्रे बँका घेत असून अशा बँकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर व कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील लखमापूरकर यांनी उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांच्याकडे दि ०२ रोजी केली आहे.
बँका शेतकऱ्यांना तीन बॉण्ड नॉटरी सहित, कर्ज न देणाऱ्या बँकांचा नोडुज,भूमिअभिलेख कार्यालयाचा टोच नकाशा,सत्तर वर्ष वय असेल तर कर्ज देणार नाही या अटी पिककर्जासाठी नसतांना बँका शेतकऱ्यांना याची मागणी करत असून यामुळे अनेक शेतकरी कर्जपासून वंचित राहत आहेत .
सरकार पिककर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बँकेवर गुन्हे दाखल करा म्हणून आदेश देत असताना प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता शेकऱ्यावर अन्यायकारक आदेश काढणाऱ्या बँकेवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवावी असे नमूद करण्यात आले आहे .
उपविभागीय अधिकारी यांनी बँकेचे हे प्रकरण तात्काळ निकाली काढण्यासाठी सर्व
बँक शाखाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश देणार म्हटल्याचे कलंबरकर यांनी गाववालाशी बोलताना सांगितले .