दिव्यांग, वृध्द, निराधार यांनी तोंडावर काळीपट्टी बांधून सरकारचा केला निषेध

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड :  जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांनी तोंडावर काळि पटि बांधून शासन प्रशासन याचा जाहिर निषेध व थाळीनांद करून हजारोच्या संख्येची आंदोलन यशस्वी केले असल्याची  माहिती चंपतरातव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी  दिली .

नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नाबाबत दि ३०जुन २० रोजी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी तोंडाला काळी पट्टी व था़लीनांद करुन मेसेज भेजो आंदोलन तिन हजार दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी सहभाग घेऊन आपला संताप व्यक्त केला
कारण शासन दिव्यांग वृध्द निराधार यांच्या संबधित 12 बारा शासन निर्णय व आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाहि ते पुढिल प्रमाणे

जागतिक करोणा संकटकाळी
दिव्यांग वृध्द निराधार बांधवांना मिळणाऱ्या अनेक योजना संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना अशा योजनेतील अनुदान
तीन महिन्यात दुपटची वाढ करून एकरक्कमी त्यांच्या खात्यात देण्याचे आदेश देऊन अद्याप आदेशाची अंमलबजावणी झाली नाही
1) मा.ऊप सचिव साहेब यांचे क्र विसयो २०२०/प्र. क्र७०/दि. २३एप्रिल २०२० यांच्या लेखी आदेशातुन केंद्र शासनाच्यानिर्देशा नुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याचे आदेश देऊन सुध्दा अद्याप दिव्यांग. वृध्द निराधार याना मिळणाऱ्या वाढीव अनुदान मिळाले नाहि.
3) दिव्याग आयुक्त पुणे यांचे लेखी आदेश दि.२६ मार्च २०२०च्या लेखी आदेशात दिव्यांगाना एक महिन्याचे धान्य किट /आरोग्य किट दिव्यांगाना घरपोच देण्यात यावे व ज्या दिव्यांगाना अन्न शिजवता येत नसलेल्याना नास्टा/जेवन/डबे देण्याचे आदेश देऊन तिन महिन्यात अंमल बजावणी झाली नाही .
4) दिव्यांग वृध्द निराधार याना मिळणाऱ्या अनेक योजनेची मिटिंग चार ते सहा महिने होत नाहि व त्यांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नाही ईत्यादी बारा लेखी आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्यामुळे
दिव्यांग बांधवानी आपल्या हक्काची जाणिव शासन प्रशासनास कळावी म्हणून त्यांना प्रत्येक कमिटीत अशासकीय सदस्य म्हणुन त्यांची निवड करण्यात यावी असे शासन आदेश असुन त्यांची अंमलबजावणी केली जात नाहि
अशा अनेक प्रश्नाबाबत शासन प्रशासनास निवेदन आपले सरकार पोर्टलवर देऊन सुध्दा शासन प्रशासन दखल घेतली जात नसल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगानी दि २२ मे २० ला नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरोघरी एका दिवसाचे एक हजार दिव्यांगानी उपोषण करुन प्रशासन साधी दखलही घेतली नाही पण शासन निर्णय दिनांक २६ मे २०२० रोजी आदेश देऊन न्याय मिळत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरोघरी दिव्यांग वृध्द निराधार हे आपल्या घरीच तोंडावर काळि पटि बांधुन थालीनांद करून आपले फोटो व निवेदन ,सकाळि १०ते सायं ६ वाजेपर्यंत आपल्या जिल्ह्यातील खासदार, आमदार,दिव्यांग आयुक्त पुणे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, यांच्या मोबाईल वर तिन हजार दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी पाठऊन आपला संताप व्यक्त केला.
हे आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सोळावा तालुक्यातील दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी सहभाग ज्ञानेश्वर नवले, माधव शिंदे, यादव फुलारी राजाभाऊ शेरकुरवार, रामलु मोगरेवार, प्रेमसीग चव्हाण, रवी कोकरे, विठ्ठल बेलकर, आशा जाधव, मनिषा गारमेलवार, अर्चना चव्हाण सुभद्राबाई शिंदे, बालीजंगिलवाड, सुदर्शन सोनकांबळे,जाधव ज्ञानेश्वर,पांडुरोग हनमत हेळगिर, शेख शादुल, बालाजी पाटील, चांदी गवाले, गजानन वंहिदे, शंकर म्हैञे,बालाजी होनपारखे, राहुल सोनुले.संगिता बामणे, नामदेव सुर्यवंशी, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी शाखाप्रमुख इत्यादी असे प्रसिद्धी प्रमुख दताञय मधेवाड